News Flash

…म्हणून मनोज वाजपेयी ‘लो बजेट’ चित्रपटांना देतो प्राधान्य

"मला छोटय़ा चित्रपटांनीच मोठं केलं"

मनोज बाजपेयी

मनोज वाजपेयी भारतातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रांवर त्यांने आपल्या अफलातून अभिनयाची छाप सोडली आहे. कुठलीही ओळख किंवा फिल्मी बॅकग्राउंड नसतानाही आज तो बॉलिवूडमधील आघाडिच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. आजवर त्याने ‘गँग्स ऑफ वासेपुर’, ‘स्पेशल २६’, ‘शूट आउट अॅट वडाला’, ‘बागी २’ यांसारख्या अनेक बिग बजेट चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु आजही त्याला छोट्या चित्रपटांचेच जास्त आकर्षण आहे. किंबहूना अगदी कमी बजेट असलेल्या चित्रपटांमध्येच तुमच्या अभिनयाची खरी कसोटी लागते असे तो म्हणतो.

लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत मनोजने त्याच्या अभिनय कारकिर्दीविषयी दिलखुलास गप्पा मारल्या होत्या. या मुलाखतीत तो म्हणाला होता, “छोटय़ा चित्रपटांचा प्रवास वेगळा असतो. हे चित्रपट बनण्यासाठी आणि विकण्यासाठीही वेळ लागतो. एखादा कॉर्पोरेट निर्माता जेव्हा तुमच्या एकमेकांच्या सगळ्या अटीशर्ती मान्य करून चित्रपट विकत घेतो तेव्हा कुठे चित्रपट प्रदर्शनासाठी तयार होतो. पण अशा छोटय़ा बजेटच्या चित्रपटांसाठीच काम करायला मला आवडतं. या छोटय़ा चित्रपटांनीच मला मोठं स्थान मिळवून दिलं आहे. हे छोटे चित्रपटच मोठी कथा सांगतात आणि खूप सारे नवीन दिग्दर्शक आहेत ज्यांना या मोठय़ा गोष्टी छोटय़ा चित्रपटांतून सांगण्यात रस आहे. त्यामुळे यापुढे तुम्हाला अशा छोटय़ा चित्रपटांची रांग लागलेली दिसेल.” असं तो म्हणाला होता.

मनोज वाजपेयी लवकरच ‘एक्सट्रेक्शन’ या हॉलिवूड चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी आणि रणदीप हुड्डा देखील झळकणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2020 1:01 pm

Web Title: why manoj bajpayee doing small budget movie mppg 94
Next Stories
1 करण जोहरच्या घरातील ‘टॅलेंटेड म्युजिशियन’;पाहा भन्नाट व्हिडीओ
2 प्रियांकाची लाख मोलाची मदत! करोना योद्ध्यांना २० हजार बुटांचं वाटप
3 बिग बॉसच्या घरात रेखा यांनी महाभारतातील दुर्योधनाकडे केले होते दुर्लक्ष?
Just Now!
X