28 February 2021

News Flash

Video : ‘ये रे ये रे पैसा २’चा धमाकेदार ट्रेलर लाँच

लंडननध्ये चित्रीकरण, महागड्या गाड्या आणि हेलिकॉप्टर्सचा तामझाम, धडाकेबाज अॅक्शन सिक्वेन्स, तगडी स्टारकास्ट आणि खटकेबाज संवाद...

लंडननध्ये चित्रीकरण, महागड्या गाड्या आणि हेलिकॉप्टर्सचा तामझाम, धडाकेबाज अॅक्शन सिक्वेन्स, उच्च निर्मितीमूल्य, तगडी स्टारकास्ट आणि खटकेबाज संवाद… हे सगळं वर्णन हिंदी चित्रपटाचं नाही, तर ९ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या ‘ये रे ये रे पैसा २’ या मराठी चित्रपटाचं आहे!

अमेय विनोद खोपकर प्रस्तुत आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित या चित्रपटाचा दमदार ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला. कर्ज बुडवून पळून गेलेला उद्योजक आणि त्याचा शोध घेणाऱ्या अण्णा आणि त्याचे अतरंगी साथीदार यांची गोष्ट ‘ये रे ये रे पैसा २’ मध्ये पहायला मिळणार असल्याचं या ट्रेलरमधून दिसतं. मात्र चित्रपटाच्या रंगतदार कथानकासह लक्ष वेधून घेतात ते खटकेबाज संवाद… अनेक टाळीबाज आणि पोटधरू हसायला लावणारे संवाद आणि प्रसंग ट्रेलरमध्ये दिसतात . तर आजपर्यंत मराठी चित्रपटात न दिसलेली भव्यता आणि चकचकीतपणाही या चित्रपटात आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयीचं कुतूहल आता आणखीच वाढलं आहे.

आणखी वाचा : ‘तुला पाहते रे’ फेम गायत्री दातारला महिलेनंच केला अश्लील मेसेज

‘ये रे ये रे पैसा २’ ची निर्मिती अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट, पर्पल बुल एंटरटेनमेंट, ट्रान्स एफएक्स स्टुडिओज आणि पॅनारोमा स्टुडिओज यांनी केली आहे. हृषिकेश कोळी यांनी पटकथा संवाद लेखन केलं आहे. या चित्रपटात अभिनेते संजय नार्वेकर, प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, विशाखा सुभेदार, स्मिता गोंदकर अशी दमदार स्टारकास्ट आहे. गायक अवधूत गुप्ते, मुग्धा कऱ्हाडे, शाल्मली खोलगडे आणि मिक्का सिंग यांनी या चित्रपटातील गाणी गायली आहेत.

येत्या ९ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2019 5:26 pm

Web Title: ye re ye re paisa 2 trailer released sanjay narvekar pushkar shrotri prasad oak others ssv 92
Next Stories
1 अखेर अनुच्या हातावर रंगणार सिद्धार्थच्या नावाची मेंदी
2 आता नाट्यगृहाबाहेर सुबोध भावे करणार डोअरकीपरचं काम
3 हार्दिक पांड्याकडून पैसे घेतल्याच्या चर्चांवर उर्वशी रौतेला भडकली
Just Now!
X