News Flash

Yuvraj and Hazel Keech Wedding: युवीने शेअर केला लग्नसोहळ्यातील पहिला फोटो

आज मोठ्या उत्साहात पार पडत आहे युवराज-हेजलचे संगीत आणि मेहंदी

युवराज सिंग, हेजल किच

क्रिकेटपटू युवराज सिंग आणि त्याची प्रेयसी हेजल किच यांच्या लग्नाचे ‘काऊंटडाऊन’ सुरु झाले आहे. मोठ्या उत्साहात गेल्या बऱ्याच दिवसांपासून सुरु असणाऱ्या तयारीचे फळ म्हणजे युवीचा हा दिमाखदार विवाहसोहळा. भारतीय संघाचा हा धडाकेबाज फलंदाज लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अभिनेत्री, मॉडेल हेजल किचच्या प्रेमात क्लिन बोल्ड झालेला युवराज ३० नोव्हेंबरला हेजलसह विवाहबद्ध होईल. पण, त्याआधी काही परंपरा आणि रुढींनुसार लग्नापूर्वी होणाऱ्या विविध सोहळ्यांना सुरुवात झाली आहे.

युवराजने त्याच्या लग्नसोहळ्यातील पहिलाच फोटो इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. यामध्ये युवराज आणि हेजल एकमेकांना शोभून दिसत आहेत. या फोटोमध्ये विशेष लक्ष वेधत आहे ते म्हणजे हेजलच्या हातांवरील मेहंदी. लग्न म्हटलं की मेहंदी आलीच. त्यामुळे ही मेहंदी हेजलच्या हातांवर सुरेख वाटत आहे. ‘स्टार्टिंग अ न्यु इनिंग्स टुडे!’ असे कॅप्शन देत युवीने सर्वांनीच दिलेल्या प्रेम आणि आशिर्वादांबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. युवी आणि हेजलच्या विवाहसोहळ्याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्याच्या लग्नाला कोणाला आमंत्रण देण्यात आले आहे इथपासून ते लग्नाच्या दिवशी हे जोडपे काय परिधान करणार आहेत याबद्दलही चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.

वाचा: Yuvraj and Hazel Keech Wedding: युवराजसाठी ‘ये इश्क नही था आसां…’

दरम्यान, युवराज आणि हेजल या दोघांचे प्रेम फुलत असताना काही काळासाठी त्यांच्यात दुरावाही निर्माण झाला होता. हेजलने युवीचा फोन उचलणे बंद केले होते. हेजलचा प्रतिसाद मिळत नसल्याने युवीने तिला फेसबुक फ्रेंडलिस्टमधून देखील बेदखल केले होते. पण अखेर दोघांमधील वाद मिटला आणि आता ते सुखाने संसाराला सुरुवात करणार आहेत. फतेहगड साहेब जिल्ह्यातील दुफेरा गावातही युवराज आणि हेजलच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. येथे ते धार्मिक गुरु अजित सिंग हंसालीवाले यांचा आशिर्वाद घेतील. युवराजच्या आई शबनम सिंग या धार्मिक गुरु संत अजित सिंग हंसालीवाले यांच्या भक्त आहेत. डेरा येथे युवी-हेजलचा विवाह शीख रितीरिवाजांनुसार होईल. या दोघांच्या आनंद कारज समारोहाला केवळ जवळचे मित्रमंडळी आणि नातेवाईक उपस्थित राहतील.

* युवराज-हेजल यांची मेहंदी सिरेमनी (प्री-वेडिंग पार्टी) २९ नोव्हेंबरला चंदिगड येथील ललित हॉटेल येथे होईल.
* ३० नोव्हेंबरला शीख विवाह पद्धतीनुसार लग्न झाल्यानंतर या दोघांकडून रात्रीच्या भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
* २ डिसेंबरला युवराज-हेजल गोवा येथे हिंदू विवाहपद्धतीनुसार लग्न करतील.
* ५ डिसेंबरला युवराज-हेजल दिल्लीमध्ये छत्तरपूर येथील फार्महाऊसवर संगीत पार्टीचे आयोजन करणार आहेत.
* ७ डिसेंबरला दिल्लीत त्यांचे रिसेप्शन होईल. यावेळी क्रिकेट आणि बॉलीवूडमधील प्रसिद्ध चेहरे उपस्थित राहतील.

वाचा: Yuvraj and Hazel Keech Wedding: ..या दोघांच्या खांद्यावर असेल युवी-हेजलच्या लग्नाची धुरा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2016 7:24 pm

Web Title: yuvraj singh and hazel keech comliment each other at their mehendi ceremony
Next Stories
1 ‘भय’च्या संगीताला बॉलिवूडचा साज!
2 सलमानसोबत करिश्मा करणार रुपेरी पडद्यावर पुनरागमन?
3 ‘नाम शबाना’ फर्स्ट लूक: तापसी ठेवतेय अक्षयच्या पावलावर पाऊल
Just Now!
X