बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आजवर त्यांच्या विविध भूमिकांमधून प्रेक्षकांची पसंती मिळवत चाहत्यांच्या मनावर राज्य केलंय. बिग बींचा त्यांच्या करिअरमधील एक महत्वाचा सिनेमा म्हणजे ‘याराना’. २३ ऑक्टोबरला या सिनेमाला ४० वर्ष पूर्ण झाली आहेत. या सिनेमातील गाण्यांना मोठी लोकप्रियता मिळाली होती.

‘याराना’ सिनेमाला ४० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बिग बींनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. या सिनेमातील ‘सारा जमाना हसीनो का दिवाना’ या सुपरहिट गाण्याच्या शूटिंगवेळीचा एक किस्सा त्यांनी शेअर केलाय. सोशल मीडियावर सिनेमाचं पोस्टर शेअर करत त्यांनी या आठवणी जाग्या केल्या आहेत. पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, “या शानदार सिनेमाला ४० वर्ष पूर्ण झाली. कोलकाताच्या एनएस स्टेडियममध्ये या गाण्याचं शूटिंग पूर्ण झालंय. इथे पहिल्यांदा एखादं शूटिंग झालं होतं… आणि कलकत्त्यामध्ये झालेल्या गर्दीचा उत्साह संपूर्ण जगात कुठेच पाहायला मिळाला नाही.” असं म्हणत त्यांनी कलकत्यामधूल आठवणींना उजाळा दिला.

जिनिलियाच्या कानशिलात लगावणाऱ्या अभिनेत्याला रितेश देशमुखने चोपलं, ‘असा’ घेतला बदला


बिग बींचं कलकत्त्याशी कायमच जवळचं आणि खास नातं राहिलं आहे. शक्षिणानंतर त्यांनी कलकत्तामध्येच पहिली नोकरी केली होती. त्यामुळे अनेकदा ते आपल्या मुलाखतींमध्ये किंवा ‘कौन बनेगा करोडरपती’च्या मंचावर कलकत्तामधील जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिग बींच्या या पोस्टला अनेकांनी पसंती दिलीय. तर अभिनेत्री शिल्पा शेट्टीने कमेंट करत म्हंटलं, “मी पाहिलेला तुमचा पहिला सिनेमा”.