ऑस्कर विजेता संगीतकार ए आर रेहमानने कायमच त्याच्या संगीताच्या जादूने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मात्र ए आर रेहमानने जुन्या आठवणींना उजाळा देताना रजनीकांत यांच्या सिनेमासाठी संगीत तयार करणं म्हणजे वाईट अनुभव होता असा खुलासा केला आहे. प्रचंड दबाव आणि वेळेच्या बंधनांमुळे सुपरस्टार रजनीकांत यांच्या सिनेमासाठी संगीत देण म्हणजे नरकात असल्याचा अनुभव असल्याचं तो म्हणाला.

रजनीकांत यांच्या सिनेमासाठी संगीत देताना खूप दबाव यायचा असं रेहमान म्हणाला. “आता गोष्टी बदलल्या आहेत मात्र यापूर्वी सिनेमांसाठी खूप दबावाखाली संगीत द्यावं लागायचं” असं तो म्हणाला. पुढे तो म्हणाला, “मार्चमध्ये आम्ही रजनीकांत यांच्या सिनेमाचं काम करायला घ्यायचो. दिवाळीत सिनेमा रिलीज करायचा आहे असं ते सांगायचे. मग मला गाणी, बॅकग्राउंट म्युझिक सर्वांवर काम करावं लागायचं. त्यात माझ्या इथे वीजेचं काही नक्की नसायचं. तरी आमच्याकडे दोन जनरेटेर होते. ते सर्व म्हणजे नरक होतं” असं रेहमान म्हणाला.

“तुमच्या वागण्याची लाज वाटतेय”; पुनीत राजकुमारला श्रद्धांजली वाहण्यासाठी केलेल्या ट्वीटमुळे रजनीकांत ट्रोल

रजनीकांत यांच्या सिनेमांना कायम प्राधान्य द्यावं लागत असल्याचं ए आर रेहमान म्हणाला. रेहमान एकाच वेळी अनेक प्रोजेक्टवर काम करत असायचा अशा वेळी केवळ रजनीकांत यांच्या सिनेमांना आधी प्राधान्य दिल्याने इतर दिग्दर्शकांना त्रास होत असा खुलासा त्याने केला. “एका वेळी मी अनेकदा तीन सिनेमांवर काम करत असायचो. इतर दिग्दर्शकही माझा सिनेमा दिवाळीला येणार आहे एआर असं म्हणायचे. या सगळ्यामुळे मला तर सणांचा तिरस्कार वाटू लागला होता. मग ती दिवाळी असो, नवीन वर्ष असो किंवा पोंगल. कारण मला सण साजरा करता येतच नव्हते. आता मात्र तसं नाही. आता बराच आराम आहे” असं म्हणत ए आर रेहमानने सुरुवातीच्या दिवसातील आठवणी ताज्या केल्या.

ए आर रेहमानने रजनीकांत यांच्या अनेक सिनेमांसाठी संगीत दिलं आहे. यात मुथू, शिवाजी: द बॉस, एन्थिरन हे अलिकडचे त्यांचे काही सिनेमा आहेत.