स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिका सध्या खूप मोठ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. अनिरुद्ध आणि अरुंधतीच्या घटस्फोटासाठी अवघे काही दिवस उरलेले असताना आता अनिरुद्धला अरुंधतीसोबत घटस्फोट घ्यायचा नाहीय. आप्पांकडे त्याने तसं बोलूनही दाखवलं आहे. द्विधा मनस्थितीत अडकलेल्या अनिरुद्धला आता संजनाशी लग्नही करायचं नाहीय. अनिरुद्धच्या या निर्णयामुळे अरुंधती आणि संजनाच्या आयुष्यात नवा संभ्रम निर्माण झाला आहे. अनिरुद्धच्या या निर्णयाचे नेमके काय पडसाद उमटणार हे जाणून घेण्याची इच्छा ही शिगेला पोहोचली आहे.
आणखी वाचा : ‘राधे माँ’, यामी गौतमचा लग्नातील ड्रेस पाहून कलाकारांनी उडवली खिल्ली
एकीकडे अनिरुद्धचं दुटप्पी धोरण तर तिकडे अभिषेक आणि अंकिताच्या नात्यातही कडवटपणा पाहायला मिळतोय. अभिषेकने लग्न करावं म्हणून अंकिताने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र अंकिताने खरंच आत्महत्येचा निर्णय घेतला होता की नाटक रचलं होतं याचा तपास आता अभिषेक करणार आहे.
View this post on Instagram
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
अंकिताचा खोटारडेपणा उघड झाला तर तिला घरातून बाहेर निघण्याची सक्त ताकीदही त्याने दिली आहे. त्यामुळे आता मालिकेत नक्की काय होणार हे जाणून घेण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘आई कुठे काय करते’ ही मालिका दररोज सायंकाळी ७.३० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.