छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून ‘आई कुठे काय करते’ या मालिकेला ओळखले जाते. या मालिकेतील सर्वच पात्र ही कायमच चर्चेत असतात. पण या मालिकेतील अरुंधती आणि अनिरुद्ध या जोडीने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत सध्या नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत नवनवीन रंजक गोष्टी घडताना दिसत आहे. नुकतंच या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. यात अनिरुद्ध हा अरुंधतीच्या घरात गुपचूप शिरतो असे पाहायला मिळत आहे.

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरश: भुरळ पाडली. काही दिवसांपूर्वी अरुंधती ही तिच्या नवीन भाड्याच्या घरात राहायला गेली आहे. या नव्या प्रोमोमध्ये अरुंधती तिच्या घरात एकटी असताना रात्रीच्या वेळी गुपचूप एक व्यक्ती शिरतो. त्यावेळी त्याच्याकडून चुकून भांड्यांचा आवाज होतो. या आवाजाने अरुंधती उठते आणि घाबरत घाबरत यशला फोन करते. यश आईला धीर देत मी येतो असे त्याला सांगतो.

यश येताच अरुंधती त्याच्याकडे धावत जाते आणि त्यांचे बोलणं सुरुच असतं. तेवढ्यात सोफ्यामागे कुणीतरी लपल्याचं त्याला जाणवतं. त्यावेळी यश दरडावून विचारतच ती व्यक्ती समोर येते. मात्र त्या व्यक्तीला पाहून अरुंधती आणि यशला धक्का बसतो. कारण ती व्यक्ती दुसरं तिसरं कुणी नसून अनिरुद्धच असतो.

दरम्यान या मालिकेचा हा नवा प्रोमो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मराठी सिरीयल्सच्या पेजवर हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. हा प्रोमो पाहून मालिकेत पुढे नेमकं काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक फार उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे. अनिरुद्ध नेमका का आला? आणि अरुंधतीच्या घरी असं लपून येण्याचं नेमकं कारण काय? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक सुद्धा उत्सुक झाले आहेत.

‘पठाण’मधील २० मिनिटांचा व्हिडीओ पाहून सलमान खानने केला शाहरुखला फोन, म्हणाला “तुझा हा चित्रपट…”

या मालिकेत काही दिवसांपूर्वी आशुतोषने अरुंधतीसमोर तिचे प्रेम व्यक्त केले होतं. त्यावर अरुंधतीने स्पष्टीकरण देत तिचे अनिरुद्धवर प्रेम असल्याचे सांगते. तसेच यापुढे आपण चांगले मित्र म्हणून राहू, असेही ती सांगते. दरम्यान आशुतोष आणि अरुंधतीच्या मैत्रीवर अनिरुद्ध संशय घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.