बॉलीवूड सुपरस्टार आमिर खानचा भाऊ फैजल खानने एका मुलाखतीत मिस्टर परफेक्शनिस्टच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितले. फैजल खानने सांगितले की, रीना दत्ता आमिर खानकडे काहीही नव्हते तरीदेखील ती त्याच्याबरोबर होती.
फैजल खानने सांगितले की, रीना फक्त आमिर खानबरोबर होती. कारण- ती त्याच्यावर प्रेम करत होती. रीनाकडे आमिर खानबरोबर राहण्याचे दुसरे कोणतेही कारण नव्हते. फैजल म्हणाला की, आमिर खान एक चांगला माणूस आहे; परंतु त्याच्या आजूबाजूचे लोक चांगले नाहीत.
‘मेला’ चित्रपटात आमिर खानबरोबर काम करणारा अभिनेता फैजल खान म्हणाला, “आमिर खान ही एक बुद्धिमान व संवेदनशील व्यक्ती आहे; परंतु त्याने त्याच्याभोवती ठेवलेले लोक चांगले नाहीत. रीना आणि माझी प्रतिमा खूप चांगली होती. ती नेहमीच माझ्याशी चांगली वागली आहे आणि जेव्हा ते दोघे (आमिर आणि रीना) वेगळे झाले तेव्हा मला खूप वाईट वाटले.” फैजल म्हणाला, “ती त्याच्याबरोबर (आमिर खान) होती, तो काहीच नव्हता. तिचा दुसरा कोणताही हेतू नव्हता. त्यांचे प्रेम शुद्ध होते.”
फैजल खानने आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्ताबद्दल सांगितले की, ती खूप हुशार व्यक्ती होती. किरण आणि मी… आम्ही कधीच बोललो नाही. मी तिला तितकेसे चांगले ओळखत नाही. मी तिच्याबरोबर कधीही वेळ घालवला नाही किंवा तिच्याशी बोललो नाही. म्हणून… मी तिला ओळखत नाही, जेणेकरून मी तिच्याबद्दल काहीही बोलू शकेन. ती मलाही ओळखत नाही. फैजल म्हणाला- २००५ मध्ये जेव्हा आमिरचे लग्न झाले, त्याआधी ती त्याच्यासोबत दोन वर्षे राहत होती.
आमिर खानचा भाऊ म्हणाला, “जेव्हा त्यांचे लग्न झाले तेव्हा आमिर व किरण दोघेही व्यग्र झाले आणि २००६ पर्यंत मी माझ्या लेखनाच्या कामातही व्यग्र झालो. त्यामुळे आम्हाला कधीच बोलण्याची संधी मिळाली नाही.” आमिर खानची नवीन प्रेयसी गौरीबद्दल सांगायचे झाले, तर फैजल म्हणाला की, तो तिला एक-दोनदा भेटला आहे. फैजल म्हणाला, “मी गौरीला भेटलो आहे; पण फक्त २-३ वेळा, जास्त नाही. मी तिला माझ्या मागच्या वाढदिवशी पहिल्यांदा भेटलो होतो, या वर्षी मी तिला भेटलो नाही.”