3 Idiots Facts R Madhavan : ‘३ इडियट्स’ हा चित्रपट केवळ बंपर हिट ठरला नाही, तर आजही प्रेक्षक हा चित्रपट आवडीने पाहतात. या चित्रपटात आमिर खानच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.
आमिर खानबरोबरच या चित्रपटात आर. माधवन, शर्मन जोशी, करीना कपूर व बोमन इराणी यांच्या कामाचेही खूप कौतुक झाले. आर. माधवनची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो रणवीर इलाहाबादियाबरोबर ‘३ इडियट्स’ चित्रपटाबद्दल बोलत आहे.
‘३ इडियट्स’ या चित्रपटाचे कथानकही खूप चांगले होते. आमिर खान, आर. माधवन व शर्मन जोशी यांसारख्या कलाकारांनी त्यात महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या. त्यातील प्रत्येक सीन आणि डायलॉग्ज लोकांना खूप आवडले. आर. माधवनने चित्रपटातील एका प्रसिद्ध सीनबद्दल सांगितले. त्यातील एक सीन परफेक्ट बनविण्यासाठी हे तिन्ही कलाकार खरोखरच दारू प्यायली होते. आर. माधवनने स्वतः याबद्दल खुलासा केला.
या व्हायरल व्हिडीओमध्ये आर. माधवनने त्या सीनच्या शूटिंगबद्दल सांगितले, ज्यामध्ये आमिर खान, शर्मन जोशी व आर. माधवन एकत्र बसले आहेत. ते त्यांच्या करिअरबद्दल बोलत आहेत की ते अभियांत्रिकी सोडून, त्यांच्या आवडत्या क्षेत्रात जातील. यादरम्यान, शर्मन त्याच्या अंगठ्या काढण्याबद्दल बोलतो आणि आर. माधवन त्याच्या कॅमेऱ्याच्या प्रेमाबद्दल त्याच्या वडिलांना सांगण्यास सांगतो. त्याच वेळी आमिर खान करीनाला प्रपोज करण्याची अट स्वीकारतो. या सीनमध्ये सर्व जण दारू प्यायलेले दिसत होते.
आर. माधवनने चित्रपटाच्या या सीनबद्दल रणवीर इलाहाबादियाला सांगितले, “आम्ही खरोखरच नशेत होतो. आमिर खान म्हणाला होता की, तुम्ही दारू प्यायल्याचे नाटक नका करू. तुम्ही प्रत्यक्षात दारू पिऊनही न प्यायल्यासारखे वागले पाहिजे. आर. माधवन शूटिंगबद्दल सांगतो, “आम्हाला ९ वाजता शूटिंग करायचे होते. आमिर आणि मी प्लॅन केला होता की, आम्ही ८ वाजता दारू पिण्यास सुरुवात करू आणि ते ८.३० किंवा ८.४५ पर्यंत चालेल. आम्ही ३-४ पॅक घेतले होते आणि शूटिंग ९ वाजता सुरू होणार होती; पण झाले असे की, ८.३० वाजता लाईट बंद करण्यात आले आणि असे सांगण्यात आले की, दोन तासांनी शूटिंग सुरू होईल.”
आर. माधवन पुढे सांगतो की, दारू प्यायल्यानंतर खूप समस्या येत होत्या. तो म्हणाला की, त्या सर्वांना त्यांच्या शरीरात अल्कोहोलची पातळी सारखीच ठेवायची होती; पण बंगळुरूची थंड हवा त्यांच्या नशेवर वेगळ्या प्रकारे परिणाम करेल हे त्यांना कळले नाही. अभिनेत्याने सांगितले की, जेव्हा शॉट आला तेव्हा त्यांना वाटले की ते नॉर्मल आहेत; परंतु डायलॉगसाठी तासन् तास लागत होते हे त्यांना कळलेच नाही.
दिग्दर्शक राजकुमार हिरानी हे त्यांच्या उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी ओळखले जातात. त्यांनी संजय दत्तचा बायोपिक ‘संजू’ आणि ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ यांसारखे चित्रपट बनवले आहेत. त्यांच्या संस्मरणीय चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘३ इडियट्स’, ज्याने कमाईच्या बाबतीत विक्रम केले.
आर. माधवनच्या कामाच्या बाबतीत बोलायचे झाले, तर तो अलीकडेच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘आप जैसा कोई’ चित्रपटात दिसला आहे. त्यामध्ये त्याच्याबरोबर अभिनेत्री फातिमा सना शेख आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे. त्यातील आर. माधवनच्या कामाचे अनेकांनी कौतुकही केले आहे.