सुपरस्टार आमिर खान चित्रपटाचा इतिहास जाणून घेण्यास उत्सुक झाला आहे. बिरेन कोठारी यांच्या `सागर मुव्हीटोन` या पुस्तकाचे प्रकाशन आमिरच्या हस्ते झाले त्यावेळेस तो बोलत होता.
मला इतिहासात फार रुची आहे, खास करून तर चित्रपट इतिहासात. मला असं वाटत की, इतिहासाचा, आत्मचरित्रांचा जितके जतन करण्याची गरज आहे तितकी भारतात केली जात नाही. भूतकाळात जेव्हा चित्रपट तयार करण्यात आले तेव्हा काय घडलं हे आपल्याला चित्रपटसृष्टीतील व्यक्तिमत्त्व म्हणून जाणून घेण्याची आणि शिकण्याची गरज आहे. त्या काळात कशा चर्चा केल्या जात होत्या, आव्हाने आणि अडचणी याबद्दल जाणून घ्यायची मला इच्छा आहे, असे आमिर म्हणाला.
सागर मुव्हिटोन पुस्तकाबाबत बोलताना आमिर म्हणाला की, चित्रपटांचे आकर्षण असणा-यांनी हे पुस्तक नक्कीच वाचावे. मला हे पुस्तक वाचायला आवडेल. हा आपला इतिहास आहे…. चित्रपटसृष्टीची सुरुवात ते कोणत्या व्यक्तींनी यास सुरु केले…. त्यामुळे हा एक महत्वाचा भाग असून त्याबद्दल वाचणे गरजेचे आहे.