बॉलीवूड अभिनेत्रींमध्ये असलेलं बॉन्डिंग आणि त्यांच्यात असलेली भांडणं ही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्यांच्या चाहत्यांना नेहमीच अभिनेत्रींच्या खऱ्या आयुष्यात काय होतंय हे जाणून घेण्याची इच्छा होते. असाच एक किस्सा स्वत: अभिनेत्रीनं सांगितला होता, तेव्हा सगळ्यांना मोठा धक्का बसला होता. हा किस्सा दिग्गज अभिनेत्री रेखा यांच्या संबंधित आहे.
आरती छाबडिया ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. आरती छाबडियाने १९९९ मध्ये मिस इंडिया वर्ल्डवाइडचा किताबही जिंकला आहे. तिने सुखविंदर सिंग यांच्या ‘नशा ही नशा है’ या गाण्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. यानंतर ती चित्रपटांमध्ये आली. तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
आरती छाबडिया आता सोशल मीडियावर फॅशन इन्फ्लुएन्सर म्हणून लोकप्रिय झाली आहे. आरतीनं ‘लज्जा’ सिनेमातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली होती. या सिनेमात तिच्यासोबत माधुरी दीक्षित, अजय देवगण, रेखा यांच्यासह अनेक लोकप्रिय कलाकारांच्या भूमिका होत्या. या सिनेमाच्या सेटवरचा एक किस्सा सध्या चर्चेत आला आहे.
सेटवर असे काय घडले, ज्याची आरतीला काहीच कल्पना नव्हती…
एका सीनमध्ये आरतीला रेखा कानशिलात लगावणार होत्या, पण या गोष्टीची आरतीला कल्पना नव्हती. जेव्हा रेखा यांनी तिच्या कानाखाली मारली तेव्हा आरती ढसाढसा रडू लागली. या गोष्टीचा खुलासा स्वत: आरतीने एका मुलाखतीदरम्यान केला होता. तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ‘लज्जा’ चित्रपटाच्या सेटवर रेखा यांनी तिला कानाखाली मारली होती. रेखा यांनी शूटिंगदरम्यान तिला मारल्यानंतर ती ढसाढसा रडू लागली होती.” आरतीची परिस्थिती पाहून सिनेमाचे दिग्दर्शक आणि रेखा यांनी तिला समजावलं होतं.
या कलाकारांसोबत केलंय काम
आरती छाबडियाने अक्षय कुमार, गोविंदा आणि सलमान खान सारख्या स्टार्ससोबत काम केले आहे. तिचे अनेक चित्रपट हिट झाले आणि अनेक चित्रपटांमध्ये तिचे कौतुक झाले. आरतीने वयाच्या तिसऱ्या वर्षी एका जाहिरातीसाठी काम केलं होतं. आरतीने ‘तुमसे अच्छा कौन है’, ‘आवारा पागल दीवाना’, ‘राजा भैया’, ‘तीसरी आँख’, ‘हे बेबी’, ‘डॅडी कूल’ यांसारख्या बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केलं. आता ती सोशल मीडियावर फॅशन इन्फ्लुएन्सर म्हणून लोकप्रिय झाली आहे.