बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सलमानची बहिण अर्पिता खानचा पती आयुष शर्माने सलमानसोबत अंतिम या चित्रपटात काम केले होते. आयुष शर्मा हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकताच आयुषने त्याच्या सोशल मीडियावर या चित्रपटाचा बिहाइन्ड द सीनचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आयुषने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओत आयुष एका फोनवर बोलत असल्याचे दिसत आहे. या कॉलवर आयुष लोन देणाऱ्या महिलेशी बोलताना दिसतो. यावेळी त्या महिलेशी तो मुदस्सर खान असल्याचे सांगत बोलत असतो. फोनवर बोलून झाल्यानंतर आयुष त्या महिलेला मजेशीर अंदाजात बोलतो, मी तुमची फसवणूक करत होतो. हा व्हिडीओ शेअर करत “मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केला..पण भाईचं लोन रिजेक्ट झालं….”, असे कॅप्शन आयुषने दिले आहे. आयुषचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : मन्नतमध्ये घुसून ‘तो’ स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करत होता, शाहरुख आला तर म्हणाला, “मला फक्त…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा : “हत्ती खूप झाले आहेत आता माहूत पाठव…’, संदीप देशपांडेंनी सांगितला राज साहेबांचा ‘तो’ मजेदार किस्सा

दरम्यान, आयुषने लव्हयात्री या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तो ‘अंतिम’ या चित्रपटात दिसला. या चित्रपटात त्याने खलनायकाची भूमिका साकारली आहे. चित्रपटातली आयुषची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.