वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला दुखापत झाल्यामुळे टी२० विश्वचषकातून बाहेर पडावं लागलं आहे. पाठीच्या समस्येमुळे त्याला जवळपास चार ते सहा महिने विश्रांतीसाठी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे यंदाचा टी२० विश्वचषक खेळण्यासाठी त्याला मैदानात उतरता येणार नाही. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा संघात समावेश करण्यात आल्याची घोषणा बीसीसीआयने शुक्रवारी केली. मात्र त्यापूर्वी सोशल मीडियावर जसप्रीत बूमराहच्या जागी कोण येणार यावरून नेटकऱ्यांमध्ये खूप चर्चा रंगली होती.

आणखी वाचा : ‘हर हर महादेव’ चित्रपटात अभिनेता शरद केळकर साकारणार बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका ?

यादरम्यान अभिनेता बॉबी देओल चांगलाच ट्रेंडमध्ये आला होता. याचे एकमेव कारण म्हणजे त्याचा एक व्हायरल व्हिडिओ. बुमराह टी२० विश्वचषक खेळू शकणार नसल्याची बातमी समोर येताच बॉबी देओलचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल तुफान व्हायरल झाला. हा व्हिडिओ एका क्रिकेट सामन्यादरम्यानचा आहे. यात बॉबी गोलंदाजी करताना दिसतोय. व्हिडिओत ज्या प्रकारे बॉबी गोलंदाजी करतोय ते पाहून त्याच्या स्टाईलची तुलना जसप्रीत बुमराहशी केली गेली.

हेही वाचा : अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्राचे ‘ते’ गाणे अखेर आज १७ वर्षांनी झाले प्रदर्शित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बॉबी देओलचा हा व्हिडिओ सेलिब्रिटी क्रिकेट लीगमधील आहे. त्यावेळी चाहत्यांमध्ये बॉबीच्या गोलंदाजीची मोठी चर्चा झाली होती. अनेकांनी त्याला जसप्रीत बुमराहच म्हटलं होतं. त्यामुळे काही नेटकऱ्यांनी बॉबीचा हा व्हिडिओ शेअर करत बुमराहच्या जागी बॉबी देओलला टी२० विश्वचषकामध्ये घ्यायला हवं अशी चर्चा सुरू केली.