सोनी टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका ‘सीआयडी’मधील एसीपी प्रद्युम्न सलमान खानच्या ‘कीक’ या आगामी चित्रपटातील ‘जुम्मे की रात गाण्या’वर सलमानबरोबर थिरकताना दिसणार आहेत. ‘कीक’ या आपल्या चित्रपटाची प्रसिद्धी करण्यासाठी या शोमध्ये आलेला सलमान कायम धीरगंभीरपणे वावरणाऱ्या एसीपी प्रद्युम्न यांना आपल्या गाण्याच्या तालावर नाचवताना दिसणार आहे. ‘सीआयडी’मध्ये एसीपी प्रद्युम्नची भूमिका साकारणारे अभिनेता शिवाजी साटम याविषयी बोलताना म्हणाले, चित्रपटाची प्रसिद्धी करण्यासाठी सलमान आमच्या शोमध्ये आल्याने मी खूप खुष आहे. सलमानबरोबर असताना नेहमी धमाल-मजा असते. त्याच्यासोबत केलेल्या नृत्याचा अनुभव फार छान होता. मालिकेचा हा भाग नक्कीच मनोरंजनात्मक असेल, अशी खात्रीदेखील त्यांनी व्यक्त केली. याआधी २००९ मध्ये सलमान ‘वॉन्टेड’ चित्रपटाची प्रसिद्धी करण्यासाठी ‘सीआयडी’मध्ये आला होता. ‘सीआयडी’च्या या भागाचे प्रक्षेपण सोनी वाहिनीवर शुक्रवारी करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Acp pradyuman shakes a leg with salman khan
First published on: 23-07-2014 at 05:54 IST