चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार एखाद्या ब्रँडचे किंवा कंपनीचे ब्रॅंड अम्बॅसिडर असतात. अनेकदा सरकारी योजनेच्या जाहीरातीसाठीही कलाकारांचे फोटो वापरले जातात. पण हे करताना त्यांचा संबंधित ब्रँडशी त्यांचा करार केला जातो. त्या करारानुसार कलाकारांचे फोटो किंवा व्हिडीओ वापरण्याची परवानगी संबंधित ब्रँडला असते. सरकारी जाहिरातींचंही असंच असतं. पण नुकताच एका कन्नड अभिनेत्याने त्याचा फोटो विनापरवानगी वापरल्याचा आरोप काँग्रेस पक्षावर केला आहे.

आईची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर पंतप्रधानांनाही मारण्याच्या होता तयारीत; २४ वर्षीय अभिनेत्याला जन्मठेपेची शिक्षा

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेता अखिल अय्यरने प्रचारात संमतीशिवाय आपला फोटो वापरल्याबद्दल काँग्रेसच्या राज्य युनिटविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. कर्नाटकातील काँग्रेस पक्ष सत्ताधारी भाजपा सरकारच्या विरोधात मोहिम राबवत होते. त्यासाठी त्यांनी बंगळुरूजवळील नेलमंगलामध्ये भाजपा कार्यालयात ‘पेसीएम’चे पोस्टर लावले होते. कांग्रेसने लावलेल्या या पोस्टरमध्ये क्यूआर कोडच्या मध्ये मुख्यमंत्री बोम्मई यांचा फोटो लावत “४० टक्के इथे घेतले जातात” असं लिहिलं होतं. या पोस्टर्सपैकी एका पोस्टरवर अभिनेता अखिल अय्यरचा फोटो वापरण्यात आला होता. फोटोसोबतच्या पोस्टरमध्ये लिहिलं होतं की, “४०% सरकारच्या लालसेने ५४ हजारपेक्षा जास्त तरुणांचं करिअर लुटलंय, मग तुम्ही अजूनही गप्प का आहात?”

“…त्यामुळे मला बिग बॉसमध्ये जावं लागलं”, पत्नीच्या निधनानंतर इंडस्ट्रीपासून दुरावलेल्या अभिनेत्याचा खुलासा

ट्विटरवर त्याचे हेच फोटो शेअर करत अभिनेता अखिल अय्यरने त्याचे फोटो अवैधरित्या वापरले जात असल्याचा आरोप केला. तो म्हणाला, “माझ्या संमतीशिवाय माझा चेहरा बेकायदेशीरपणे वापरला जात असल्याचे पाहून मला धक्का बसला आहे. ४०% सरकार ही काँग्रेसची मोहीम आहे आणि माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही. मी यावर कायदेशीर कारवाई करेन.” अखिलने या पोस्टमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सिद्धरामय्या यांना टॅग करत या प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यासंदर्भात इंडियन एक्सप्रेसने आमदार आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कम्युनिकेशन सेलचे प्रमुख प्रियांक खर्गे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ट्विटनंतर पोस्ट काढून टाकण्यात आल्याचे सांगितले. “नेहमी आम्ही अशा मोहिमांसाठी फक्त शटरस्टॉक फोटो वापरतो. पण यावेळी नजरचुकीमुळे कदाचित हा फोटो वापरला गेला असावा. आम्ही हे सर्व पोस्टर्स आणि फोटो हटवले आहेत,” असं ते म्हणाले.