मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेता जितेंद्र जोशीने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नाटक, टीव्ही, चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये दमदार अभिनय करत जितेंद्रने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. सोशल मीडियावरही तो कायम सक्रिय असतो, जितेंद्र जोशी सध्या आपल्या लेकीसह लंडन फिरायला गेला आहे. लेकीबरोबरच्या आंतरराष्ट्रीय ट्रिपचा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्याने या पोस्टला भावुक कॅप्शन दिले आहे.

हेही वाचा : “ए आर रहेमानच्या आईने प्रार्थना केली अन्…” शंकर महादेवन यांनी सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाले “त्यांचे खूप उपकार…”

अभिनेता जितेंद्र जोशी आणि त्याची लेक रेवा सध्या लंडन फिरायला गेले आहेत. या व्हिडीओमध्ये रेवा खूप आनंदी दिसत आहे. याला कॅप्शन देत अभिनेता लिहितो, “रेवा १३ महिन्यांची असताना आम्ही पहिल्यांदा ट्रिपला गेलो होतो. आता लवकरच ती १३ वर्षांची होणार आहे….माझ्याबरोबर तिची ही पहिली आंतरराष्ट्रीय ट्रिप…यासाठी खास आम्ही मिस्टर शेक्सपियरच्या देशात आलोय, मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो आणि हे सगळे माझ्या बायकोमुळे शक्य झाले.”

हेही वाचा : ‘आदिपुरुष’मधील प्रभासच्या लुकवर प्रसिद्ध अभिनेत्रीने केली टीका, म्हणाली “अभिनेता रामासारखा नव्हे तर महाभारतातील…”

जितेंद्र जोशीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर त्याचे अनेक चाहते आणि कलाकार कमेंट करत आहेत. अभिनेत्री अमृता सुभाषने “रेवा आनंदी आहे हे पाहून मला खरंच छान वाटलं, जीतू…तू खूप चांगला बाप आहेस” तसेच अभिनेता रितेश देशमुखने, “आज मी पाहिलेला सर्वात गोड व्हिडीओ… खूप सुंदर रेवा”, तर दिग्गज अभिनेते अनिल कपूर यांनी सुद्धा “हा व्हिडीओ मला खूप आवडला जीतू” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिनेता स्वप्नील जोशी, अनिकेत विश्वासराव, सारंग साठ्ये, प्रसाद ओक, अभिनेत्री स्पृहा जोशी, मेघना ऐरंडे, क्रांती रेडकर, नेहा पेंडसे, सोनाली कुलकर्णी यांनीही या व्हिडीओवर कमेंट करीत जितेंद्र जोशीचे आणि रेवाचे कौतुक केले आहे.