गायक आणि संगीतकार शंकर महादेवन नेहमीच त्यांच्या गाण्यांनी प्रेक्षकांचं मन जिंकतात. पण, त्यांच्या आयुष्यात असा एक दिवस आला होता की, तब्येतीच्या कारणास्तव त्यांना लाइव्ह कार्यक्रमामध्ये परफॉर्म करणं शक्य होणार नव्हतं. अलीकडेच ‘O2 इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत शंकर महादेवन यांनी याबाबत खुलासा केला आहे.

हेही वाचा : ‘आदिपुरुष’मधील प्रभासच्या लुकवर प्रसिद्ध अभिनेत्रीने केली टीका, म्हणाली “अभिनेता रामासारखा नव्हे तर महाभारतातील…”

शंकर महादेवन म्हणाले, “अमेरिकेत जेव्हा मी ए. आर. रेहमानबरोबर कॉन्सर्ट करायचो तेव्हा खूप वरच्या पट्टीत गाणं सुरु व्हायचं. एके दिवशी परफॉर्म करताना माझा आवाज पूर्णपणे गेला…काही बोलताच येत नव्हतं, अशावेळी काय करायचं आपण सगळ्या लोकांचा हिरमोड करू शकत नाही याची मला कल्पना होती म्हणूनच मी कॉन्सर्टमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला.”

हेही वाचा : Miss World 2023 : ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेचं यजमानपद यंदा भारताकडे; तब्बल २७ वर्षांनी मिळाला बहुमान

शंकर महादेवन पुढे म्हणाले, “मला चांगलंच आठवतं तेव्हा रहेमान यांच्या आई कॉन्सर्टला उपस्थित होत्या. चित्राजी, कविताजी, बाळू सर, रहेमानची आई हे सगळे लोक एकत्र आले आणि सर्व माझ्यासाठी प्रार्थना करू लागले. रेहमानच्या आई जप करत होत्या, चित्राजींनी त्यांच्याकडे असणारी पावडर मला दिली होती, ज्यामुळे तुमच्या घशातील खवखव बरी होऊन आवाज खुलतो. यानंतर मी रंगमंचावर गेलो वरच्या पट्टीत सरगम गायली आणि माझा आवाज पुन्हा आधीसारखा झालेला होता. त्या सगळ्यांचे खूप उपकार आहेत त्यांनी मला आत्मविश्वास दिला म्हणून, संपूर्ण कार्यक्रमात मी व्यवस्थित परफॉर्म केले.”

हेही वाचा : “नट्टू काका सेटवर अनेकदा रडले” जेनिफर मिस्त्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली “एक सुट्टी मागितल्यावर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“त्या दिवशी अशक्य गोष्ट शक्य झाली… हे सोपं नव्हतं, रहेमानचा माझ्यावरचा विश्वास, त्याच्या आईची प्रार्थना या सगळ्या गोष्टींमुळे हे शक्य झालं, त्यांच्यामुळे मी परफॉर्म करू शकलो” असे शंकर महादेवन यांनी सांगितले. दरम्यान, संगीतकार ए.आर.रहेमान आणि शंकर महादेवन यांच्यात गेली अनेक वर्ष मैत्री आहे. रेहमानने संगीतबद्ध केलेल्या अनेक गाजलेल्या चित्रपटातील गाणी शंकर महादेवन यांनी गायली आहे.