छोट्या पडद्यावरील ‘लागिर झालं जी’ ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरली होती. या मालिकेत अज्याची भूमिका साकारणारा अभिनेता नितीश चव्हाण हा नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो. नितीश चव्हाण हा नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असतो. नुकतंच नितीशने अभिनेत्री श्वेता खरात हिच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टनंतर त्या दोघांचे अफेअर सुरु असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. नितीश चव्हाणची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

अभिनेत्री श्वेता खरात हिचा काल वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसानिमित्त नितीश चव्हाण याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याने श्वेतासोबतचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. त्यासोबत त्याने तिचे कौतुकही केले आहे. त्याच्या या पोस्टनंतर ते दोघेजण रिलेशनशिपमध्ये आहेत का, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

नितीश चव्हाणची इन्स्टाग्राम पोस्ट

“श्वेता the fighter…. तुझा आज वाढदिवस, खास दिवस, जन्मदिवस आज या निमित्ताने तुला सांगावस वाटतंय की तुला fighter यासाठी म्हंटलो कारण इतकी वर्ष मी तुला बघत आलोय, आपण एकत्र करिअरची सुरुवात केली या प्रवासात किती चढ उतार आले, किती अवघड परिस्थिती आली पण त्यावर तू मात केलीस आणि आज तू जे काही आहेस ते फक्त आणि फक्त तू घेतल्याला मेहनतीमुळे आणि सातत्यामुळे.

तुझ्या बरोबर राहून तुझ्याकडून खूप काही शिकलो. तुझ्यात ती positive energy आहे. तुझ्यात तो गोडवा आहे, तुझ्यात ती परिस्थितीवर मात करण्याची ताकद आहे. तू कधीच give up करत नाहीस. तू जिथे गेलीयेस तिथे तू तुझी छाप पाडलेली आहेस.

तू माझ्या आयुष्यातला एक महत्वाचा भाग आहेस. तू कायम खुष रहा, निरोगी रहा, आंनदी रहा आणि मुख्य म्हणजे कायम हसत रहा. कारण तू जिथे असतेस तिथंल वातावरण आपोआप हसत खेळत राहतं हे माहितेय मला आणि अजून एक कारण हसत रहा कारण हसल्यावर तुझी डिंपल दिसते.

स्वामींच्या आणि आई तुळजाभवानीच्या कृपेने तुझी अशीच उत्तरोउत्तर प्रगती होत जातो, तुला उदंड आयुष्य देवो. आता माझ्या style मध्ये, Many many वाढदिवसाच्या hardik मुबारकं. लव्ह यू, गॉड ब्लेस यू, असे नितीश चव्हाणने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नितीश चव्हाणच्या या पोस्टखाली अनेक कमेंट पाहायला मिळत आहे. त्याची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. दरम्यान श्वेता ही ‘मन झालं बाजींद’ मध्ये मुख्य भूमिकेत झळकत होती. ती या मालिकेत कृष्णाची भूमिका साकारत आहे. श्वेता खरात ही सध्या तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. कृष्णाची भूमिका साकारणारी अभिनेत्री श्वेता खरात हि खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश आहे.