लोकप्रिय अभिनेते पंकज त्रिपाठी यांचे करोडो चाहते आहे. त्यांनी २००४ मध्ये ‘रन’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर पंकज यांनी अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटाने त्यांना बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख दिली आणि ‘मिर्झापूर’ या वेब सिरीजने त्यांना घराघरात पोहोचवले. या सिरीजमध्ये भरपूर अपशब्द वापरण्यात आले आहेत. याबाबत विचार करत अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी एक नवी घोषणा केली आहे. यापुढे ते त्यांच्या चित्रपटांमध्ये आणि वेब सिरिजमध्ये शिवीगाळ करणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार आयुष्मान खुरानाचा ‘ड्रीम गर्ल २’, नुसरत नव्हे तर, ‘ही’ अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका

अनेक चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या पंकज त्रिपाठी यांनी नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान ही माहिती दिली आहे. अलीकडेच एका संवादादरम्यान पंकज त्रिपाठी यांनी कलाकार म्हणून पडद्यावर ते वापरत असलेल्या त्यांच्या भाषेबद्दल सांगितले. यादरम्यान, “तुम्ही तुमच्या चित्रपटांमध्ये अपशब्द वापरण्यापासून स्वतःला दूर ठेवणार आहात का?”, असे त्यांना विचारण्यात आले. या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले. “मी ज्या भूमिका साकारेन त्यात त्या सीनची मागणी लक्षात घेऊन आवश्यक असेल तर तरच मी अपशब्द क्रिएटिव्ह म्हणून वापरेन.”

हेही वाचा : ‘गँग्स ऑफ वासेपूर’साठी पंकज त्रिपाठी नव्हते अनुराग कश्यपची पहिली पसंती, जाणून घ्या कसे बदलले नशीब

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याआधी २०२० मध्ये एका मुलाखतीदरम्यान पंकज त्रिपाठी म्हणाले होते की त्यांना अपशब्द वापरणं, गैरवर्तन करणं असलं काही मान्य नाही. ते म्हणाले होते, “जर एखाद्या अभिनेत्याने पडद्यावर शिवीगाळ केली तर ती तो एका विशिष्ट संदर्भात करतो. याचा अर्थ असा नाही की मी शिवीगाळ करण्याला समर्थन देतो. पण एखादी शिवी देणं ही जोपर्यंत त्या सीनची मागणी नसते तोपर्यंत मी माझ्या चित्रपटांमध्ये अपशब्द बोलणे टाळतो. एक कलाकार म्हणून मी काय काम करतोय याची जाणीव मला आहे,”