अभिनेता प्रभास हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. बाहुबली या चित्रपटाने त्याला जगभरात ओळख मिळवून दिली. त्याचा चाहतावर्गही प्रचंड मोठा आहे. प्रभासचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण आता त्याच्या एका फोटोमुळे त्याच्या सर्वांनाच खूप धक्का बसला आहे.

प्रभासचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तो त्याच्या एका चाहतीबरोबर पोज देताना दिसत आहे. पण या फोटोमध्ये त्याच्या डोक्यावर पूर्णपणे टक्कल असल्याचं दिसत आहे. चित्रपटांमध्ये डॅशिंग अंदाज दिसणारा प्रभासला खऱ्या आयुष्यात टक्कल पडल्याचं दिसताच सर्वांनाच धक्का बसला आहे.

आणखी वाचा : “लग्न कधी करणार?” चाहत्याच्या प्रश्नावर प्रभासने सोडलं मौन, विवाहस्थळाचा खुलासा करत म्हणाला…

याआधी प्रभासला कोणीही या लुकमध्ये पाहिलेलं नाही. त्यामुळे त्याचा हा फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण या फोटो मागील सत्य काही वेगळंच आहे. मीडिया रिपोर्टनुसार, व्हायरल होत असलेला प्रभासचा हा फोटो फोटोशॉप केलेला आहे. त्यामुळे या व्हायरल फोटोमध्ये काहीही तथ्य नाही.

हेही वाचा : प्रभासने इटलीमध्ये खरेदी केलेला व्हिला पर्यटकांसाठीही खुला, भाडं म्हणून दरमहा कमावतो तब्बल…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, प्रभास काही दिवसांपूर्वीच आदिपुरुष या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत झळकला. या चित्रपटावर सर्वत्र टीका झाली. तरी यानंतर आता प्रवास प्रोजेक्ट के आणि सलार या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.