अभिनेता प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत हे मराठी चित्रपटसृष्टीतील रसिकांचं आवडतं जोडपं. या दोघांनाही एकत्र काम करताना पाहायला मिळावं ही प्रेक्षकांची कायमच इच्छा असते. मात्र गेली काही वर्ष हा योग जुळून आला नव्हता. आता दहा वर्षांनी प्रिया आणि उमेश रंगभूमीवर ‘जर तरची गोष्ट’ या नाटकातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत.

प्रिया बापट सादर करत असलेल्या सोनल प्रॉडक्शननिर्मित या नाटकाचे दिग्दर्शन अद्वैत दादरकर, रणजित पाटील यांनी केले असून इरावती कर्णिक यांनी लेखन केले आहे. तर नंदू कदम ‘जर तरची गोष्ट’चे निर्माते आहेत. या नाटकात प्रिया बापट, उमेश कामत, आशुतोष गोखले आणि पल्लवी अजय प्रमुख भूमिकेत दिसतील.

रंगमंचावर एकत्र काम करण्याबाबत प्रिया बापट म्हणते, ‘‘हे माझं दुसरं व्यावसायिक नाटक आहे. आपलीच निर्मिती असलेल्या नाटकात अभिनय करायला मिळणं आणि तेही आपल्या आवडत्या सहकलाकारासोबत ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. हा माझा हट्ट आणि इच्छा होती की माझं पुढील नाटकही उमेशसोबतच असावं. यासाठी आम्ही फार वाट पाहिली. अखेर ही इच्छा पूर्ण झाली आहे. अतिशय प्रेमाची आणि हक्काची माणसं या नाटकाशी जोडली गेली आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता लवकरात लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची उत्सुकता आह’’ तर उमेश प्रियासोबत पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल म्हणतो, ‘‘नाटक हे माझं पहिलं प्रेम आणि माझ्या खऱ्या आयुष्यातील माझं प्रेम असं एकत्र मी माझ्या नवीन नाटकात जगणार आहे. ‘नवा गडी नवं राज्य’ या नाटकानंतर आम्ही एकत्र एक चित्रपट केला, वेबमालिका केली. परंतु त्यानंतर असं वाटत होतं की एकत्र नाटक कधी करणार? आणि आता हा योग जुळून आला आहे. त्यामुळे प्रचंड उत्सुकता आहे.’’