scorecardresearch

“गोव्याला गेलो तरी २० ते २५ हजार खर्च होतात मग…”, संतोष जुवेकरने चाहत्यांना केलं दत्तक पालक होण्याचे आवाहन

त्याद्वारे त्याने त्याच्या चाहत्यांना एक आवाहन केले आहे.

santosh juvekar
संतोष जुवेकर

मराठी मालिका, चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून संतोष जुवेकरला ओळखले जाते. संतोष जुवेकरने ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘एक तारा’ आणि ‘रेगे’ यासारख्या मराठी चित्रपटात दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही खूप चांगली पसंती मिळाली. संतोष जुवेकरचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. नुकतंच संतोष जुवेकरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याद्वारे त्याने त्याच्या चाहत्यांना एक आवाहन केले आहे.

संतोष जुवेकरने मालिका, चित्रपट, नाटक या सर्व प्लॅटफॉर्मवर आपली जादू दाखवली आहे. संतोष सोशल मीडियावरही तितकाच सक्रीय असतो. तो अनेकदा त्याच्या आगामी प्रोजेक्टविषयीची माहिती सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर दत्तक पालक व्हा असे आवाहन करणारी एक पोस्ट शेअर केली आहे.

Video : “हा काय संतोष जुवेकर हाय…”; सेल्फी काढण्यासाठी आलेल्या चाहत्याने उडवली अभिनेत्याची खिल्ली

संतोष जुवेकरची इन्स्टाग्राम पोस्ट

“घरच्यांना बरोबर मित्र मैत्रिणींना बरोबर बाहेर कधी नुसतं जेवायला गेलो तरी ६ ७ हजार bill सहज येत. मग जर फक्त १० हजारात आपण एखाद्या
मुलाचं/मुलीचं वर्षाचं अन्न नक्कीच पुरवू शकतो.

वर्षातन एखादी गोव्याची trip केली तरी २० २५ हजार सहज खर्च होतात आपले. मग फक्त १५ हजारात एखाद्या मुलाचा/मुलीचा वर्षभराचा शिक्षणाचा खर्च नक्कीच करून त्या मुलाचे/ मुलीचे दत्तक पालकत्व स्वीकारू शकतो आपण.

आणि हे सगळं ज्यांना मनापासून करावंसं वाटतं आणि जे आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत आणि ज्यांना कुठलीही अडचण नाही त्यांनी नक्कीच कराव पण मदत म्हणुन नाही तर कर्तव्य म्हणुन.आणि ही बळजबरी नाही”, अशी पोस्ट संतोष जुवेकरने शेअर केली आहे.

“पश्या मला तुला कडकडून मिठी मारायची आहे…”, ‘धर्मवीर’ चित्रपट पाहिल्यानंतर संतोष जुवेकरची आई भावूक

“माझ्या फेसबुकवर फारच अश्लील फोटो…”, संतोष जुवेकरचे फेसबुक अकाऊंट हॅक

दरम्यान संतोषचा ‘हिडन’ चित्रपट हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात संतोष जुवेकरने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. संतोष जुवेकरने ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘एक तारा’ आणि ‘रेगे’ या मराठी चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या. या चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही खूप चांगली पसंती मिळाली.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actor santosh juvekar appeal to adopt child share instagram post viral nrp