scorecardresearch

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेच्या प्रेक्षकांना मोठा धक्का, ‘तारक मेहता’ फेम शैलेश लोढाने सोडली मालिका?

तसेच मालिकेच्या करारामुळे तो नाराज असल्याचे दिसत आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक नाव म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात घर गेले आहे. या मालिकेतील जेठालाल आणि तारक मेहता ही जोडी घराघरात प्रसिद्ध आहे. मात्र तारक मेहता हे पात्र साकारणारे शैलेश लोढा यांनी या मालिकेला रामराम केला आहे. नुकतंच याबाबतचे वृत्त समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दयाबेन, टपू यानंतर आता तारक मेहता ही भूमिका साकारणारे शैलेश लोढा यांनी ही मालिका सोडली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते या मालिकेचे शूटींग करताना दिसत नाही. जवळपास १ महिन्यापूर्वीच त्याने ही मालिका सोडल्याचे बोललं जात आहे. तो पुन्हा शो मध्ये परतणार नसल्याचेही बोललं जात आहे. त्यामुळे प्रेक्षकांना धक्का बसला आहे.

Dharmaveer Box Office Collection : ‘धर्मवीर’ चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी

ई-टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, शैलेश लोढा यांनी या मालिकेला राम-राम केला आहे. या मालिकेत शैलेश लोढा यांनी जेठालालचा मित्र असलेल्या तारक मेहता या मनोरंजक व्यक्तिरेखेत दिसला होता. शैलेश लोढा यांना दिलेल्या तारखांचा योग्य वापर न झाल्यामुळे त्याने हा शो सोडला आहे. तसेच मालिकेच्या करारामुळे तो नाराज असल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्याला अनेक प्रकल्पही सोडावे लागले आहेत. मात्र काही दिवसांपासून त्याला दुसरी संधी गमवायची नाही. त्यामुळे तो शो मधून बाहेर पडला आहे.

तसेच काही दिवसांपूर्वी तारक मेहताच्या सेटवर शैलेश लोढा आणि दिलीप जोशी यांच्यात वाद झाल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. त्यामुळे त्या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे बोललं जात आहे. तसेच ते दोघेही एकमेकांशी बोलत नसल्याचेही बोललं जात आहे. मात्र, त्यानंतर एका मुलाखतीत शैलेश लोढा यांनी हे वृत्त चुकीचे असल्याचे सांगितले होते. दिलीप जोशी आणि मी खूप जवळचे मित्र आहोत. आमच्यात कधीही भांडण होऊ नये, अशी प्रार्थना मी करतो. आम्ही सेटवर आणि ऑफस्क्रिनही एकमेकांचे चांगले मित्र आहोत, असे त्यांनी यावेळी म्हटले होते.

“माझा पाठिंबा आहे…”, अभिनेत्री प्राजक्ता माळीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतून शैलेश लोढा यांना लोकप्रियता मिळाली. त्यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. शैलेश एक अभिनेता असून कवी आणि लेखक देखील आहेत. त्यांनी आजपर्यंत अनेक पुस्तके लिहिली आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actor shailesh lodha to quit taarak mehta ka ooltah chashmah will his exit impact show popularity nrp

ताज्या बातम्या