अभिनेता सिद्धार्थ जाधव हा लवकरच त्याच्या पत्नीपासून घटस्फोट घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. सिद्धार्थची पत्नी तृप्ती हिने सोशल मीडियावरुन जाधव हे सासरचं आडनाव हटवल्यानंतर ते दोघेही वेगळे घेणार असल्याचे बोललं जात आहे. तृप्ती हिने सोशल मीडियावर अक्कलवार हे तिचं माहेरचं आडनाव लावलं आहे. सिद्धार्थ आणि तृप्ती यांच्यात सारं काही आलबेल नसल्याचे म्हटलं जात आहे. त्यामुळे लवकरच ते घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र नुकतंच सिद्धार्थने एका वेबसाईटसोबत बोलताना या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘आमच्यात सर्व काही ठीक आहे’, असे तो म्हणाला.

सिद्धार्थ जाधव आणि तृप्ती यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. नुकतंच सिद्धार्थने हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना याबाबत प्रतिक्रिया दिली. यावर तो म्हणाला, “या सर्व अफवा कुठून पसरवल्या जात आहेत, हेच मला कळत नाहीत. आम्ही एकत्र आहोत. आमच्यात सर्व काही व्यवस्थित आहे.” ही प्रतिक्रिया देताना सिद्धार्थने थोडी चिडचिड व्यक्त केली.

रेल्वे स्टेशनवर प्रपोज ते कुटुंबियांचा विरोधात जाऊन केलेलं लग्न, सिद्धार्थ आणि तृप्तीची ‘प्यारवाली लव्हस्टोरी’

कौटुंबिक मतभेदामुळे गेल्या दोन वर्षांपासून तुम्ही वेगळे राहत असल्याचा प्रश्न यावेळी सिद्धार्थला विचारण्यात आला. त्यावर त्याने “सब कुछ ठीक है” अशी प्रतिक्रिया दिली. यापुढे सिद्धार्थने या विषयावर बोलण्यास नकार दिला.

“मी आणतो भाजी कारण…”, रामदास आठवलेंनी सांगितला घरात भाजी आणण्याचा ‘तो’ किस्सा

दरम्यान ई-टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या दोन वर्षांपासून सिद्धार्थ आणि तृप्ती हे एकत्र राहत नाहीत. सिद्धार्थ आणि तृप्तीने २००७ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांना स्वरा आणि इरा या दोन मुली आहेत. सिद्धार्थ आणि तृप्ती झलक दिखला जा या शोमध्ये सहभागी झाले होते. या शोमध्ये तृप्ती आणि सिद्धार्थच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

“सत्ता बळकावणार्‍याला नाही तर…”, अभिनेते किरण माने यांची मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र तृप्ती आणि सिद्धार्थ यांचं सोशल मीडिया अकाऊंट पाहिलं असता तर गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी एकमेकांसाठी एकही पोस्ट केलेली नाही. तसेच कोणतेही कार्यक्रम किंवा पार्ट्यांमध्येही ते दोघं एकत्र दिसले नाहीत. इतकंच नव्हे तर सोशल मीडियावर दोघांनीही एकमेकांना अनफॉलो केलं आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्याबद्दल विविध अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र सिद्धार्थने या सर्व अफवा खोट्या असल्याचे सांगितले आहे.