अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधनही संपूर्ण इंडस्ट्रीसाठी मोठा धक्का आहे. सिद्धार्थ शुक्लाचे निधन हृदयविकारच्या झटक्याने झाले. सिद्धार्थ शुक्लाचा चाहता वर्ग खुप मोठा आहे. सध्या सिद्धार्थचा आणि माधुरीचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
जून महिन्यात सिद्धार्थ वेब सीरिज ‘ब्रोकन बट ब्यूटीफूल’ या सीरिजचे प्रोमोशन करण्यासाठी कलर्सवरील लोकप्रिय डान्स रिअॅलीटी शो ‘डान्स दिवाने’ या शो मध्ये सहभागी झाला होता. यावेळचा सेटवरील सिद्धार्थचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सिद्धार्थ एक असा अभिनेता होता की तो सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असायचा. तो वेगवेगळे व्हिडिओ शेअर करत फॅन्सशी संपर्कात राहायचा. सिद्धार्थने ७ जून रोजी शेअर केलेला माधुरी दीक्षित सोबतचा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवर ट्रेंड होतं आहे. यात सिद्धार्थ आणि माधुरी दीक्षित ‘राम लखन’ या चित्रपटातील ‘तेरा नाम लिया’ या गाण्यावर डान्स करत आहेत. यात सिद्धार्थने काळ्या रांगाचा फॉर्मल सूट तर माधुरीने लाल रंगाची साडी परिधान केली होती. हा व्हिडिओ शेअर करत त्याने एक छानसं कॅप्शन ही दिलं होतं.
View this post on Instagram
सिद्धार्थ आणि माधुरीच्या हा जुना व्हिडिओ पाहूण नेटकरी भावुक झालेले दिसत आहेत. सिद्धार्थचा जन्म मुंबईत झाला असून त्याने एक मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली होती. २००४ साली त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर २००८मध्ये त्याने बाबुल का आंगन छूटे या मालिकेत काम केले. पण ‘बालिका वधू’ या मालिकेने त्याला खरी ओळख मिळवून दिली होती. त्याच्या अचानक निधनामुळे संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. अनेक कलाकार सोशल मीडियावर सिद्धार्थ बरोबरच्या असलेल्या आठवणी शेअर करत सिद्धार्थला श्रद्धांजली अर्पण करीत आहेत.