अभिनेता सोनू सूद त्याच्या अभिनयापेक्षा आता सामाजिक कार्यासाठी ओळखला जातो. संपूर्ण करोना काळात त्यानं ज्याप्रकारे देशभरातील लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत केली त्याचं सर्वत्र कौतुक झालं आहे. आज सोनू सूद सामाजिक कार्यामध्ये हातभार लावत असला तरी त्याचा स्वतःचा संघर्ष काही कमी नाही. मॉडेलिंगपासून त्याने आपल्या करियरची सुरवात केली. हळूहळू त्याला काम मिळू लागली. मात्र सोनू जास्त दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दिसला. हिंदीत दबंगमध्ये साकारलेले पात्र आजही लोकांच्या लक्षात आहे. अशा या दबंग अभिनेत्याला बॉलिवूडपेक्षा जास्त दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आवडते.

‘बॉम्बे जर्नी’ या कार्यक्रमात अनेक सेलिब्रेटी येत असतात. या कार्यक्रमात ते मुंबईबद्दलच्या आठवणी सांगतात. याच कार्य्रक्रमात सोनू सूददेखील आला होता. तेव्हा त्याला प्रश्न विचारण्यात आला की कोणती चित्रपटसृष्टी जास्त आवडते? त्यावर लगेचच त्याने उत्तर दिले ‘दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी’. तो पुढे म्हणाला की ‘दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने मला खूप काही शिकवले. अभिनय, कॅमेरा तांत्रिक बाजू या सर्व गोष्टी मला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत शिकायला मिळाल्या. मी अनेकवेळा स्टुडिओमध्ये थांबून संकलन कसे करतात हे बघायचो. डबिंग शिकलो, मी स्वतः इंजिनियर असल्याने मला या गोष्टी शिकायला खूप आवडतात. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोक तुम्हाला शिकवताना मदत करतात. मी याबाबतीत खूप नशीबवान आहे’.

आर्यन खानच्या प्रेमात पाकिस्तानी अभिनेत्री? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटात सोनू सूद हा चांद बरदाईच्या भूमिकेत आहे. त्याच्या कामाचं कौतुक चाहत्यांकडून झालं होत.चित्रपटाला मात्र फारसे यश मिळाले नाही. मध्यंतरी त्याने भोंगे आणि हनुमान चालीसा या वादात आता उडी घेतली होती. सोनुने फक्त सामाजिक कार्यात सहभाग न दाखवतात रशिया युक्रेन युद्धात अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी मदत केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोनू सूद मूळचा पंजाबी असून त्याने आपले शिक्षण नागपूर येथून केले आहे. तामिळ चित्रपटातून त्याने अभिनय करण्यास सुरवात केली. ‘जोधा अकबर’, ‘युवा’, ‘आशिक बनाया आपने, यांसारख्या हिंदी चित्रपटात त्याने काम केले आहे. नकारात्मक भूमिकेसाठी त्याला अनेक पुरस्कारदेखील मिळाले आहेत. २०१६ साली त्याने ‘शक्ती सागर’ नावाची निर्मिती संस्था सुरु केली.