मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून सुबोध भावेला ओळखले जाते. सुबोध भावेने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. तो सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. त्याने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात त्याने आणि त्याच्या पत्नीने सोशल मीडियावर ट्रेंडींग असलेल्या एका म्युझिकवर ताल धरला आहे.

सुबोध भावे आणि त्याचे कुटुंबिय सध्या राजस्थानला फिरण्यासाठी गेले असताना त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात एका फ्रेमवर लिहले आहे “सुट्टीला आलोय फिरायला” तर “दुसऱ्या फ्रेमवर सुट्टीला आलोय आराम करूया” असा कॅप्शन लिहला आहे. या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ‘सुट्टी कशासाठी? असा कॅप्शनदेखील दिला आहे. त्यांचा मुलगा कान्हाने हा व्हिडीओ शूट केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुबोध अभिनेता दिग्दर्शक म्हणून ओळखला जातोच मात्र त्याची पत्नी मंजिरी भावेदेखील निर्माती आहे. या दोघांची ‘कान्हा मॅजिक’ नावाची निर्मिती संस्था आहे. सुबोध नुकताच’ हर हर महादेव’ चित्रपटात झळकला होता आता त्याचा ‘वाळवी’ चित्रपट पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. परेश मोकाशी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.