गेल्या काही दिवसांपासून विविध विषयांच्या धाटणीचे मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. झिम्मा, झोंबिवली, टाइमपास ३, पावनखिंड, शेर शिवराज यासारखे विविध चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्यानंतर आता डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘एकदा काय झालं!!’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटात अभिनेता सुमीत राघवन आणि अभिनेत्री उर्मिला कोठारे प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहे. मात्र या चित्रपटाला शो न मिळाल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला आहे. अभिनेता सुमीत राघवनने नुकतंच ट्विटरवर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : “दारातून वळून बघितलं तर…” निवेदितावरील प्रेमाची जाणीव कशी झाली?, अशोक सराफ यांनी सांगितला किस्सा

सुमीत राघवन हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच सुमीतने ट्विट आणि फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने मराठी चित्रपट आणि त्याला मिळणारे शो याबद्दल भाष्य केले आहे. यात त्याने फेसबुकवर एका व्यस्त गृहस्थांचा व्हिडीओ शेअर केला आहे. याला कॅप्शन देताना तो म्हणाला, “९३ वर्षांच्या मोहनदास सुखटणकर काकांनी काल suncity ,विले पार्ले येथे #एकदाकायझालं बघितला आणि त्यांचा गहिवरून फोन आला. ते म्हणाले,माझा मुलगा आणि सून,मला हाताला धरून फिल्मला घेऊन गेले. अडीच वर्षांनी मी चित्रपटगृहात गेलो आणि त्याचं सार्थक झालं. ते म्हणाले, चित्रपटाचा एवढा परिणाम होता की घरी आल्यावर मी १५ मिनिटं घेतली स्थिर व्हायला. ते पुढे म्हणाले, ह्या फिल्मचा हँगओव्हर इतक्यात जाणार नाही.”

South Superstar Allu Arjun Pushpa 2 The Rule makers spent 60 crore on Gangamma Thalli jatara scene
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील ‘या’ सीनसाठी खर्च केले ६० कोटी रुपये! एक-दोन नव्हे तर ‘इतके’ दिवस लागले शूटिंगसाठी
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
Amitabh Bachchan stopped talking to Jaya Bachchan
दोन दिवस जया बच्चन व मुलांशी बोलले नव्हते अमिताभ बच्चन, ‘त्या’ चित्रपटाच्या सेटवर असं काय घडलं होतं? जाणून घ्या
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’

“हे सगळं ऐकल्यावर, त्यांना भेटलो , त्यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांच्याशी गप्पा मारल्या. ही झाली आमच्या काकांची गोष्ट. आता दुसरी गोष्ट म्हणजे,९३ व्या वर्षी जर आमचे काका चित्रपटगृहात जाऊन आमची फिल्म बघू शकतात तर मग “अरे ott वर आल्यावर बघू किंवा टीव्ही वर बघू” असा विचार नका करू. तुम्ही जर थिएटर मध्ये नाही आलात तर आमचे shows कमी होतील आणि हा पिक्चर सर्वांपर्यंत नाही पोहोचणार. मान्य आहे,मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळत नाहीत पण तुम्ही आलात तर थिएटर्स ना शो लावण्याशिवय पर्याय नाही उरणार”, असे त्याने म्हटले आहे.

“महाराष्ट्रात राहून मातृभाषेच्या चित्रपटासाठी झगडावे लागत असेल तर…”, ‘डॅडी’चा जावई अभिनेता अक्षय वाघमारेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

इतकंच नव्हे तर सुमीत राघवनने ट्विटरवरही काही ट्वीट शेअर करत याबद्दलचा संताप व्यक्त केला आहे. सुमीतने याबद्दल जवळपास ५ ते ६ ट्वीट केले आहेत. यात तो म्हणाला, “काल आमच्या चित्रपटावरच्या एका पोस्ट मध्ये एक वाक्य लिहिलं होतं की “जिथे पिकतं तिथे विकत नाही”. आज एक आठवडा झाला #EkdaKaayZala प्रदर्शित होऊन आणि मुंबईत जेमतेम ३ shows आहेत,एक ठाण्याला आहे,महाराष्ट्रात अनेक ठिकाणी एकही शो नाहीये. हिंदी चित्रपटांसाठी आमचा बळी जाताना दिसतोय.”

“कारण काय तर बुकिंग होत नाही. ज्यांना #मराठी बद्दल आस्था आहे, ते वाट बघतात आमचा चित्रपट टीव्ही वर किंवा ott var येण्याची. जे राजकीय पक्ष आहेत,अशा वेळेला त्यांना मराठीला सावत्र वागणूक दिल्याबद्दल आक्षेप नाहीये. बरं मी हे का बोलतोय? कारण #एकदाकायझालं चं एकमुखाने कौतुक होत आहे. फेसबुक/ट्विटर/इंस्टा सगळीकडे कौतुकाचा वर्षाव होतोय. ऐतिहासिक,सामाजिक,राजकीय चित्रपटांच्या गर्दीत एका सर्व सामान्य कुटुंबाची गोष्ट आहे ज्या मध्ये, बघणाऱ्या प्रत्येकाला स्वतःचं काहीतरी मिळतंय,काहीतरी खोल आत ढवळलं जातंय.”

“पुन्हा एकदा नाती घट्ट करण्याच्या दृष्टीने, कुटुंबाचं महत्त्व पुन्हा दृढ करण्याच्या दृष्टीने,आजी आजोबांचं स्थान किती महत्त्वाचं आहे,मनं जपणं किती गरजेचं आहे अशा एक ना अनेक गोष्टी सांगणारा हा चित्रपट आहे. तर सांगायचं हे की कृपा करून घराबाहेर पडा आणि आमचा चित्रपट बघा. हिंदी बद्दल आक्षेप नाही पण विनंती आहे की किमान दोन आठवडे तरी द्या आम्हाला. एकतर तिकीट १००/- ,त्यात shows नाहीत. कसं होणार सांगा? एक उत्तम चित्रपट लुप्त होऊ देऊ नका. प्रेक्षक आणि सर्व पक्ष,सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. चित्रपट बघा आणि तुम्ही ठरवा”, असे सुमीत राघवनने यात म्हटले आहे.

“माझ्या वयाच्या तिसऱ्या वर्षी…”, गायक सलील कुलकर्णींनी सांगितली त्यांच्या आजोबांची खास आठवण

दरम्यान सुमीत राघवनच्या या ट्वीटवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहे. विशेष म्हणजे मराठी चित्रपटांना थिएटर्स न मिळणे, प्राईम टाईम या मुद्द्यावर अनेक कलाकारांनी याआधी संताप व्यक्त केला होता. गेल्या काही दिवसांपासून या मुद्द्यावर सातत्याने कलाकार टीका करताना दिसत आहेत.