अभिनेता निहार पांड्याची पत्नी आणि गायिका नीति मोहन नुकतीच आई झालीय. २ जूनला नीतिने मुलाला जन्म दिला. त्यानंतर आता नीतिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मुलाची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केलीय. याचसोबत नीतिने त्यांच्या मुलाचं नाव देखील जाहीर केलंय. नीतिने इन्स्टाग्रामवर चार फोटो शेअर केले असून यात निहारसुद्धा आहे.
नीतिने शेअर केलेल्या एका फोटोत निहार आणि नीति आपल्या बाळाकडे आनंदाने पाहत असल्याचं दिसतंय. तर एका फोटोत निहार आणि नीतिने मुलाल मांडिवर घेतल्याचं पाहायला मिळतंय. नीतिने त्यांच्या या पूर्णत्वास आलेल्या छोट्याश्या कुटुंबाचे क्यूट फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांनी देखील तिच्या फोटोला पसंती दिलीय. तर अभिनेत्री अनुष्का शर्माने देखील नीतिच्या या फोटोंवर कमेंट केली आहे. “तुमच्या सारख्या दोन सुंदर व्यक्तींना माझ्याकडून शुभेच्छा” अशी कमेंट अनुष्काने केली आहे.
View this post on Instagram
नीतिने हे फोटो शेअर करत एक सुंदर कॅप्शन दिलंय. “या नाजूक हातांना पकडणं हे आता पर्यंतचे सर्वात सुंदर क्षण आहेत. आर्यवीरने आम्हाला आई-वडील म्हणून निवडलं आहे. याहून चांगले आशिर्वाद काय असणार. त्याने आमच्या आयुष्यात आनंद वाढवलायं.” नीति मोहनच्या या पोस्टवर तिची बहिण मुक्तीने देखील कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. तसचं अभिनेत्री मौनी रॉय, पंखुडी अवस्थी आणि अभिनेत्री अपारशक्ति खुराना यांनी देखील कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
हे देखील वाचा: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील बापूजींचं हे रुप पाहिलंत का?; पत्नी आहे खूपच ग्लॅमरस
View this post on Instagram
दरम्यान, मुलाच्या जन्मानंतर निहारने एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. “माझ्या वडिलांनी जे मला शिवकलं ते माझ्या मुलाला शिवकण्याची संधी माझ्या पत्नीने मला दिली आहे. प्रत्येक दिवस माझ्या आयुष्यात आनंद पसरवत आहे.” असं म्हणत निहारने एक सुंदर पोस्ट शेअर केली होती.