scorecardresearch

“किरीट सोमय्या स्वतःच गायब आहेत; आता लोकांनीच निर्णय घ्यावा…”, दीपाली सय्यद यांनी लगावला टोला

दीपाली सय्यद यांनी आज शिवसेनेतर्फे आयोजित महिला उद्योजक मेळाव्यात हजेरी लावली असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

actress dipali sayyad, kirit somaiya,
दीपाली सय्यद यांनी आज शिवसेनेतर्फे आयोजित महिला उद्योजक मेळाव्यात हजेरी लावली असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला. यानंतर सोमय्या यांना कधीही अटक होऊ शकते. किरीट सोमय्या हे नेहमीच मोकळेपणाने त्यांचं मत मांडताना दिसतात. पण गेल्या काही दिवसांपासून ते या सगळ्यापासून लांब आहेत. किरीट सोमय्या स्वतःच गायब आहेत. याचा अर्थ आता लोकांनी बघावं आणि कोण काय आहे याबाबत लोकांनी स्वतः निर्णय घ्यावा असा टोला शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी लगावला आहे.

दीपाली सय्यद यांनी आज शिवसेनेतर्फे आयोजित महिला उद्योजक मेळाव्यात हजेरी लावली होती. यावेळी हा कार्यक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले आणि पुढे बोलताना नुसतीच आश्वासने देण्यापेक्षा प्रत्यक्षात रोजगार दिल्यावरच महिलांना सक्षम होतील. आई-वडील मुलगी झाल्यावर मुलीच्या लग्नासाठी दागिने तयार करतात. मात्र, दागिने बनवण्याऐवजी जर मुलींच्या शिक्षणावर खर्च केला तर मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहील, स्वतःच्या पायावर उभी राहील व्यवसाय करेल आणि लग्नानंतर सुद्धा नवऱ्याला हातभार लावू शकते अस सांगितलं. तर किरीट सोमैय्या गायब असल्याबाबत दीपाली सय्यद म्हणाल्या, “सध्या घाणेरडे राजकारण चालू आहे. एकमेकांच्या घरातील वाभाडे काढणे, जातीपातीचे राजकारण, ईडीच्या कारवाया सुरू आहेत. जे इतके दिवस आरोप करत होते ते किरीट सोमय्या स्वतःच गायब आहेत, याचा अर्थ आता लोकांनी बघावं आणि कोण काय आहे याबाबत लोकांनी स्वतः निर्णय घ्यावा,” असा टोला किरीट सोमैय्या यांना लगावला.

आणखी वाचा : “मी तुमच्या आणि तुमच्या पत्नीच्या पाया पडलो आणि तुम्ही…”, शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर विवेक अग्निहोत्रीने दिलं उत्तर

आणखी वाचा : महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रस्थान असलेला शरद पवार यांचा ‘सिल्व्हर ओक’ बंगला आतून कसा दिसतो, पाहा फोटो

यावेळी त्यांनी महिलांना मार्गदर्शन केलं. शिवसेना व युवा सेना यांच्या संयुक्त विद्यमाने टिटवाळा मंदिर धर्मशाळा येथे महिलांना व्यवसायात प्रोत्साहन देण्यासाठी महिला उद्योजक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात शेकडो महिलांनी सहभाग घेतला. या मेळाव्याला ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ,दीपाली सय्यद, मुंबई सिनेट सदस्य शीतल देवरुखकर,युवा सेना सह सचिव जयेश वाणी यांनी महिलांना मार्गदर्शन केलं.

आणखी वाचा : “छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर…”, ‘शेर शिवराज’ चित्रपटात अफजल खानाची भूमिका साकरणारे मुकेश ऋषी यांचे वक्तव्य चर्चेत

यावेळी प्रकाश पाटील यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदाच महिला उद्योजकांसाठी मेळावा आयोजित केला. महिलांना सक्षम करण्यासाठी शिवसेना व युवा सेनेतर्फे हा प्रयत्न सुरू आहे. या मेळाव्यात महिलांना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून करण्यात येतोय. या मेळाव्यामध्ये विविध बँकांनी देखील सहभाग घेतला होता. यावेळी प्रकाश पाटील यांनी ठाणे ग्रामीण परिसरात १०० इलेक्ट्रिक वाहन महिलांसाठी उपलब्ध करून देणार असून २५ महिलांना मिळूनही एक गाडी देण्यात येणार असल्याचं सांगितलं.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actress dipali sayyad criticise kirit somaiya dcp