बॉलिवूड चित्रपटसृष्टीमधील काही अभिनेत्री या त्यांच्या बोल्ड फोटोशूटसाठी ओळखल्या जातात. या यादीमधील एक अभिनेत्री म्हणजे ईशा गुप्ता. ईशा ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती तिच्या बोल्ड फोटोंसाठी विशेष ओळखली जाते. नुकताच ईशाने असाच एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

ईशा गुप्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक टॉपलेस फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती बाल्कनीत उभी असल्याचे दिसत आहे. हे फोटो शेअर करत तिने छान असे कॅप्शन दिले आहे. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चर्चेत आहे.

ईशा ‘जन्नत 2’, ‘रुस्तम’, ‘टोटल धमाल’, ‘बादशाहो’ या सारख्या चित्रपटांमध्ये झळकली आहे. तसंच येत्या काळात ती काही चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये देखील झळकणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी ईशाने बाथरुममधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमुळे ती चर्चेत होती. बोल्ड फोटो शेअर केल्यामुळे बऱ्याचवेळा इशाला ट्रोल व्हावे लागते. अलिकडेच झालेल्या एका मुलाखतीत तिने ट्रोलर्सला उत्तर दिले होते. तसेच २०२० या वर्षात मीच सगळ्यात जास्त ट्रोल झाली असेन असेदेखील तिने या मुलाखतीत म्हटले होते.