अवॉर्ड शो सेलिब्रिटींच्या लूक्समुळे आणि विजेत्यांमुळे चर्चेत असतात. पण बऱ्याचदा अवॉर्ड शोमध्ये काहीतरी असा प्रसंग घडतो, जो व्हायरल होतो आणि त्याचीच जास्त चर्चा होते. असाच काहीसा प्रकार हॉलिवूडमधील एका अवॉर्ड सोहळ्यात घडला आहे. अवॉर्ड घ्यायला स्टेजवर जाताना अभिनेत्री पायऱ्यांवर पडली.

Video: अदिती राव हैदरी व सिद्धार्थ लग्न करणार? अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओवर सेलिब्रिटींच्या कमेंट्स चर्चेत

अलीकडेच लॉस एंजेलिसमध्ये एसएजी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या सोहळ्यात अभिनेत्री जेसिकाच्या नावाची घोषणा करण्यात आली. ती ट्रॉफी घेण्यासाठी स्टेजवर चढत असताना तिचा ड्रेस पायात अडकला आणि ती पडली. ४५ वर्षीय अभिनेत्री जेसिकाने लाल रंगाचा गाऊन परिधान केला होता. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

चाहत्याने मृणाल ठाकूरला केलं प्रपोज; अभिनेत्री उत्तर देत म्हणाली, “माझ्याकडून या नात्याला…”

‘जॉर्ज अँड टॅमी’मधील उत्कृष्ट अभिनयासाठी जेसिकाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. जेसिका ट्रॉफी स्वीकारण्यासाठी स्टेजवर जात असताना अभिनेत्रीचा गाऊन तिच्या पायात अडकला आणि ती खाली पडली. या प्रकारामुळे खजील झालेल्या अभिनेत्रीने तिचा ड्रेस यामागचं कारण असल्याचं सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“असं काहीतरी होईल याची मला अजिबात कल्पना नव्हती. मी पायऱ्यांवर पडले, पण काही लोकांना तिथे नेमकं काय झालं, हे माहीत नाही, ही चांगली गोष्ट आहे. मी माझ्याच ड्रेसमध्ये अडकले. पण माझ्यासोबत खूप छान माणसं होती, त्यांनी मला मदत केली, हा एक प्लस पॉइंट होता,” असं जेसिका म्हणाली.