प्रसिद्ध टीव्ही आणि चित्रपट अभिनेते रसिक दवे (Rasik Dave) यांचं शुक्रवारी (२९ जुलै) रात्री ८ वाजता निधन झालं. मुंबईमध्येच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रसिक दवे हे ‘महाभारत’ कार्यक्रमामधील ‘नंद’ या व्यक्तिरेखेसाठी ओळखले जात होते. याशिवाय त्यांनी अनेक गुजराती नाटक, गुजराती चित्रपट आणि अनेक मालिकांमध्येही काम केलं. त्याचबरोबरीने ते प्रसिद्ध अभिनेत्री केतकी दवे (Ketki Dave) यांचे पती होते. केतकी यांनी पतीच्या निधनानंतर दुःख व्यक्त केलं आहे.

आणखी वाचा – Video : “बाजीप्रभु देशपांडे यांच्या समाधीचं दर्शन घ्या कारण…” लेकीसह विशाळगडावर गेलेल्या अजय पुरकरांचं शिवप्रेमींना आवाहन

रसिक दवे यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी केतकी यांनी बॉम्बे टाइम्सला मुलाखत दिली. यावेळी त्या म्हणाल्या, “आपल्या आजाराबाबत व्यक्त होणं रसिक यांना कधीही आवडलं नाही. आपलं खासगी आयुष्याबाबत बोलणं त्यांनी नेहमी टाळलं. सगळं काही ठिक होईल असं त्यांना वाटायचं. पण आम्हाला याची कल्पना होती की की सगळं काही सुरळीत होऊ शकत नाही. तू नेहमीच काम करत राहिलं पाहिजे हे गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी मला सांगितलं होतं. सध्यातरी काम करण्याच्या परिस्थितीमध्ये नाही असं त्यांना मी सांगिताच शो मस्ट गो ऑन असं त्यांनी मला आवर्जुन सांगितलं.”

आणखी वाचा – कारमध्ये शरीरसंबंध ते थ्रीसम, विजय देवरकोंडाचे सेक्स लाइफबद्दल खुलासे

“सगळं काही ठिक होईल असं रसिक आजारी असताना देखील सतत सांगत होते. ते नेहमीच माझ्याबरोबर होते म्हणून आज मी हिंमतीने सगळ्या परिस्थितीला सामोरं जात आहे. माझं कुटुंब, मुलं, सासू आज सगळे माझ्याबरोबर आहेत. पण मला माझ्या पतीची खूप आठवण येत आहे. पण आता आयुष्य पहिल्यासारखं राहिलं नाही. प्रत्येक क्षणी मला रसिक यांची उणीव भासते.” असं केतकी यांनी सांगितलं.

आणखी वाचा – “मी कोणती मशीन आहे का?” तिसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चांबाबत स्पष्टच बोलली करीना कपूर खान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केतकी सध्या प्रत्येक प्रसंगाचा हिंमतीने सामना करत आहेत. रसिक दवे शेवटचे ‘कलर्स टीव्ही’वरील ‘संस्कार-धरोहर अपना की’ या मालिकेत दिसले होते. या मालिकेत त्यांनी करसनदास धनसुखलाल वैष्णव यांची भूमिका साकारली होती. याशिवाय रसिक दवे याआधी ‘सोनी टीव्ही’च्या सर्वात दीर्घकाळ चाललेल्या ‘एक महल हो सपनो का’ या मालिकेत काम केलं होतं. हा शो १००० भाग पूर्ण करणारा पहिला हिंदी शो मानला जातो. तसेच त्यांनी दूरदर्शनवरील प्रसिद्ध शो ‘व्योमकेश बक्षी’ मध्येही काम केलं होतं.