‘कोंबडी पळाली’ या गाण्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं होत. या गाण्यात भरत जाधव, क्रांती रेडकर या दोन कलाकारांनी गाण्यात धमाल उडवून दिली होती. अभिनेत्री क्रांती रेडकर मध्यंतरी चित्रपटसृष्टीपासुन दूर होती मात्र ती आता पुन्हा एकदा सक्रिय होताना दिसून येत आहे. अभिनेत्रीला दिग्दर्शिका म्हणून आपण बघितले आहे. आता ती निर्माती म्हणून आपल्यासमोर येणार आहे. तिच्या निर्मिती संस्थेद्वारे ती एका रिॲलिटी शोची प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या बरोबरीने निर्मिती करणार आहे.

क्रांती रेडकर सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. आपल्या हटके पोस्टमधून ती नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असते. नुकताच तिने एक मजेशीर व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात तिने प्लॅनेट मराठीचे ऑफिस दाखवले आहे. व्हिडिओमधला एका आवाज प्रत्येक कर्मचाऱ्याला विचारतो प्लॅनेट मराठी ओटीटीवर पहिल्यांदा एक रिॲलिटी शो येत आहे त्याचे निर्माते कोण? प्रत्येक कर्मचारी उत्तर देतो ‘दॅट हॅप्पी गर्ल’. अखेरीस हा प्रश्न प्लॅनेट मराठीचे सर्वेसर्वा अक्षय बरदापुरकर यांना विचारण्यात येतो तेव्हा ते क्रांती रेडकरला समोर आणून या सगळ्याचा खुलासा करतात. या शोची पूर्ण माहिती काही दिवसात आपल्यासमोर येईलच. दॅट हॅप्पी गर्ल असं तिच्या निर्मिती संस्थेचे नाव आहे.

कपिल शर्माने उडवली अभिनेत्री राधिका आपटेची खिल्ली, म्हणाला “तुझा चेहरा मला… “

अभिनेत्री क्रांती रेडकर एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांची पत्नी आहे. आर्यन खान प्रकरणामुळे हे दोघे चांगले चर्चेत होते. क्रांती रेडकर नुकतीच झी मराठी वाहिनीवरील उंच माझा झोका या कार्यक्रमात सूत्रसंचाकाच्या भूमिकेत दिसली होती. तिच्याबरोबर पंकजा मुंडेदेखील सूत्रसंचालन करत होत्या. ‘जत्रा’, ‘ऑन ड्युटी २४ तास’, ‘माझा नवरा तुझी बायको’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटात काम केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

क्रांतीने ‘गंगाजल’ या चित्रपटातदेखील काम केले होते. तसेच ‘काकण’ नावाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. क्रांतीचा स्वतःचा व्यवसायदेखील आहे. ‘झिया झायदा’ (ZiyaZyda) असं क्रांतीच्या ब्रॅण्डचं नाव आहे. याबरोबर क्रांतीने (KraKar) ज्वेलरी ब्रॅण्डसुद्धा लाँच केला आहे.