Nithya Menen Talks About Shooting Of Idly Kadai : दाक्षिणात्य चित्रपट आणि बॉलीवूडमध्ये आपली ओळख निर्माण करणाऱ्या या अभिनेत्रीला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.

आम्ही बोलत आहोत नित्या मेननबद्दल. तिच्या कारकिर्दीत तिने हिंदी, मल्याळम, तेलगू, तमिळ आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि तिला खूप प्रशंसाही मिळाली आहे. पण, हे यश मिळवण्यासाठी या अभिनेत्रीला बराच संघर्ष करावा लागला आहे.

अभिनेत्री नित्या मेननने अलीकडेच तिच्या कारकिर्दीत अशा भूमिका स्वीकारल्याबद्दल सांगितले, ज्यामुळे तिला अशा गोष्टी करण्याची संधी मिळाली, ज्या तिने अन्यथा कधीही अनुभवल्या नसत्या. यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश होता, मग ते गावात राहणे असो किंवा हातांनी शेण उचलणे असो.

सिनेमा विकटनला दिलेल्या मुलाखतीत नित्याने राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करताना तिच्या नखांमध्ये शेण कसे होते हे सांगितले आणि या अनुभवाला ‘आश्चर्यकारक’ म्हटले.

‘इडली कढाई’ आणि राष्ट्रीय पुरस्काराबद्दल नित्या काय म्हणाली?

नित्याने मुलाखतीत सांगितले की, तिला असे पात्र साकारायचे आहेत जे तिला नवीन अनुभव घेण्यास आणि जीवन जगण्यास मदत करतील. उदाहरण देताना ती म्हणाली, ‘इडली कढाई’साठी मी शेणाच्या गोवऱ्या बनवायला शिकले. त्यांनी मला विचारले की मी ते करण्यास तयार आहे का आणि मी हो म्हणाले, नक्कीच. अशा प्रकारे मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच माझ्या हातांनी शेणाच्या गोवऱ्या बनवायला शिकले आणि गोल करायला शिकले.”

नित्याने असेही सांगितले की, तिने राष्ट्रीय पुरस्कारांसाठी दिल्लीला जाण्यापूर्वी शेणाबरोबर एक सीन शूट केले होते. ती म्हणाली, “खरं तर मी राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी जाण्याच्या एक दिवस आधी मी हे सीन करत होते. जेव्हा मी राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेले तेव्हा माझ्या नखांमध्ये शेण होते हे खूप आश्चर्यकारक आहे. हे सुंदर आहे, नाही का? हे जीवन आहे. या चित्रपटातून मला मिळालेले वेगवेगळे अनुभव मला खूप आवडतात, अन्यथा मला हे करण्याची संधी मिळाली नसती.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘इडली कढाई’चित्रपटाबद्दल

धनुषने ‘इडली कढाई’ची कथा लिहिली, दिग्दर्शित केली आणि सह-निर्मिती केली आहे. नित्या व्यतिरिक्त अरुण विजय, शालिनी पांडे, सत्यराज, पार्थिवन, पी समुथिरकानी आणि राजकिरण हे देखील यात काम करत आहेत. १ ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटासाठी जीव्ही प्रकाश कुमार यांनी संगीत दिले आहे. २०२२ मध्ये आलेल्या ‘थिरुचित्रम्बलम’ चित्रपटानंतर नित्याने धनुषबरोबर काम करण्याची ही दुसरी वेळ आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.