गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टीत बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्ये फरक केला जात आहे. अनेक कलाकार यावर विविध प्रतिक्रिया देत आहे. नुकतंच अभिनेत्री राशी खन्ना हिने एका चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दाक्षिणात्य चित्रपटाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. तिच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. नुकतंच या संपूर्ण प्रकरणावर अभिनेत्री राशी खन्ना ही अधिकृत वक्तव्य जारी केले आहे. मी सर्व भाषा आणि चित्रपटांचा आदर करते, असे तिने म्हटले आहे.

राशी ही इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने हे सर्व वक्तव्य फेटाळले आहेत. ती म्हणाली, “गेल्या काही दिवसांपासून मी दक्षिण भारतीय चित्रपटांबद्दल काही चुकीची वक्तव्य केल्याच्या बातम्या समोर येत आहे. मात्र माझ्याबद्दल पसरवण्यात येणारी ही सर्व विधाने बनावट आणि पूर्णपणे चुकीची आहेत. ही विधान सोशल मीडियावर वेगाने पसरत जात आहेत.”

“मी तुम्हाला विनंती करते की जर हे कोणी करत असेल, तर कृपया ते थांबवा. मी आतापर्यंत जे काही चित्रपट केले आहेत, त्या सर्व भाषेतील चित्रपटांचा आदर करत आली आहे आणि भविष्यातही कायम आदर करेन. चला एकमेकांसोबत प्रेमाने जगूया”, असे राशी म्हणाली.

घटस्फोटाच्या ६ महिन्यानंतर समांथाने शेअर केला नागाचैतन्यसोबतचा खास फोटो, म्हणाली…

दरम्यान काही दिवसांपूर्वी राशी खन्नाने दाक्षिणात्य चित्रपटांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. दक्षिण चित्रपटांमध्ये लूक फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्या ठिकाणचे लोक मला अभिनेत्री म्हणून गंभीरपणे घेत नाहीत. ‘रुद्र’ आणि माझ्या आगामी काही चित्रपटांमुळे त्यांची विचारसरणी बदलेल, असे मला वाटते. दक्षिणेत लोक तुम्हाला लेडी, मिल्की ब्युटी अशा नावांनी लेबल लावतात. त्यांना असे वाटते की स्त्रिया या फक्त आक्षेप घेण्यासाठी आहेत. स्त्रीची स्तुती करणे आणि तिच्यावर आक्षेप घेणे यातील फरक त्यांना समजत नाही, असे ती म्हणाली होती. या वक्तव्यानंतर अनेक तेलुगु भाषिक चाहते राशी खन्नावर चांगलेच संतापले होते.

कोण आहे राशी खन्ना?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राशी खन्ना ही अभिनेत्री आणि पार्श्वगायिका आहे. तिने आतापर्यंत अनेक तेलुगू आणि तामिळ भाषेतील चित्रपटात काम केले आहे. तिने मद्रास कॅफे या हिंदी चित्रपटात सहाय्यक भूमिकेत साकारत सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने अनेक तेलुगू, तामिळ, मल्याळम चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. राशी खन्ना अलीकडेच अजय देवगनसोबत ‘रुद्र: द एज ऑफ डार्कनेस’ या थ्रिलर सीरिजमध्ये दिसली होती. या वेबसीरिजमधील राशीच्या अभिनयाचं प्रचंड खूप कौतुक झालं होतं.