अभिनेत्री राखी सावंतच्या दुसऱ्या वैवाहिक जीवनात वादळ आलं आहे. नुकतंच राखीने तिचा पती आदिल खानचं दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर असल्याचा गंभीर खुलासा केला आहे. अशातच राखी सावंतांच्या आदिलबरोबरच्या ब्रेकपच्या चर्चा सुरु असतानाच राखी सावंतने यावर भाष्य केलं आहे.

मॉडेल व अभिनेत्री राखी सावंत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच तिच्या आईचं निधन झालं. त्यानंतर आता राखीने तिच्या दुसऱ्या लग्नाबाबत नवा ड्रामा सुरू झाला आहे. राखीने आदिल खानचं दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर असल्याचा खुलासा केला त्यानंतर राखीने व्हिडीओ शेअर करत आपली खंत व्यक्त केली होती. आता तिने पुन्हा एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात ती असं म्हणते “नमस्कार सर्वांना मला माध्यमांना हे सांगायचे आहे की आदिल बरोबर माझे ब्रेकअप झालेले नाही किंवा आदिल मला सोडून गेलेला नाही. आम्ही एकाच घरात राहत आहोत. त्यामुळे अफवा पसरवू नका.

सचिनसुद्धा शून्यावर…” ‘सर्कस’ चित्रपटाच्या अपयशावर सिद्धार्थ जाधवची प्रतिक्रिया चर्चेत

ती पुढे म्हणाली, मी फक्त अदिलच्या दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर असल्याचे माध्यमांना सांगितले जेणेकरून त्या मुलीला एक धडा मिळेल. कारण आदिलचे लग्न झाले आहे. हे तिला कळायला हवं, आमचं कधीच ब्रेकअप होणार नाही. असा खुलासा तिने केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
rakhi

दरम्यान राखी सावंत आणि आदिल खानने मे महिन्यात कोर्ट मॅरेज केलं होतं. परंतु, लग्नाच्या सात महिन्यांनी राखीने तिच्या लग्नाचा खुलासा केला होता. तेव्हाही बऱ्याच दिवसांच्या ड्रामानंतर आदिलने राखीबरोबर लग्न केल्याचं मान्य केलं होतं. आदिलच्या अफेअरमुळे संसारात वादळ आल्याचं राखीने म्हटलं आहे.