अभिनेत्री रितिका श्रोत्री ही मराठी मनोरंजन सृष्टीतील तरुण अभिनेत्रींपैकी एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. आतापर्यंत अनेक चित्रपटांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत तिने तिच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची वाहवा मिळवली. तर आता लवकरच ‘बॉईज ४’मध्ये ती दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या चाहत्याचा एक अनुभव सांगितला आहे.

आणखी वाचा : मृणाल कुलकर्णी आणि रितिका श्रोत्रीमध्ये आहे खास नातं; खुलासा करत अभिनेत्री म्हणाली, “ती विराजसच्या…”

रितिकाचा चाहतावर्ग मोठा आहे. तिथे चहा ते तिच्याशी बोलण्याचा, तिला भेटण्याचा विविध मार्गांनी प्रयत्न करताना दिसतात. रितिकाही सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. काही वर्षांपूर्वी एक मुलगा तिला सतत मेसेजेस करायचा, त्याचा किस्सा तिने शेअर केला आहे.

हेही वाचा : “वाढती लोकप्रियता डोळ्यांत खुपल्यामुळे काही कारस्थान्यांनी…,” किरण मानेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘तारांगण’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “माझ्या कॉलेजमध्ये एक मुलगा होता तो मला “मला भेट” वगैरे असे काहीही मेसेज करायचा. तर माझे जे मित्र होते त्यांनी त्या मुलाची मस्करी करायचं ठरवलं. रितिका म्हणून ते माझ्या मोबाईलवरून त्याच्याशी बोलू लागले. एक दिवस त्यांनी एक जागा आणि वेळ ठरवली आणि त्या मुलाला भेटायला बोलावलं. त्या मुलाला मेसेजमधून सांगितलं गेलं की मी (रितिका) त्याला भेटायला येणार आहे. तो बिचारा मुलगा ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी केक वगैरे घेऊन आला होता. पण मी तिथे नव्हतेच. नंतर मी त्या मुलाला मेसेज करून माझ्या मोबाईलवरून माझे मित्र तुझ्याशी बोलत होते हे खरं सांगितलं आणि त्याला सॉरी म्हटलं. त्या मुलाच्या मनात काहीही खोट नव्हती त्याला फक्त मला भेटायचं होतं त्यामुळे मला त्याचं वाईट वाटलं.” आता रितिकाने सांगितलेला हा किस्सा चर्चेत आला आहे.