श्रेया बुगडे ठरणार पुढची बिग बॉस वाईल्ड कार्ड स्पर्धक? फोटोंमुळे चर्चांना उधाण

बिग बॉसमध्ये अनेक स्पर्धक वाईल्ड कार्डद्वारे सहभागी होताना दिसत आहे.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम म्हणून ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाकडे पाहिलं जातं. ‘बिग बॉस’ मराठी ३ हा शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. सध्या बिग बॉसमध्ये अनेक स्पर्धक वाईल्ड कार्डद्वारे सहभागी होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर लवकरच बिग बॉसमध्ये अभिनेत्री श्रेया बुगडे सहभागी होणार असल्याचे बोललं जात आहे.

‘चला हवा येऊ द्या’ या मालिकेतून घराघरामध्ये पोहोचलेली अभिनेत्री म्हणून श्रेया बुगडेला ओळखलं जाते. गेली चार वर्षे श्रेयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. नुकतंच श्रेयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोमुळे ती बिग बॉसच्या घरात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

श्रेयाने शेअर केलेल्या या फोटोत तिच्या गळ्यात एक लॉकेट दिसत आहे. ते लॉकेटवर बिग बॉसचा लोगो आहे. तिने हे लॉकेट घालून चार फोटो शेअर केले आहेत. या चारही फोटोत तिचे लॉकेट स्पष्ट दिसत आहे.

डॅडींचा जावई पुन्हा बिग बॉस गाजवणार? इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चांना उधाण

श्रेयाचे हे फोटो पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. बिग बॉसचा डोळा, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर दुसऱ्या एका व्यक्तीने तिसरा डोळा अशी कमेंट केली आहे. तिच्या या फोटोमुळे ती बिग बॉसमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र अद्याप तिने याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही.

दरम्यान बिग बॉसमधून वाईल्ड कार्डद्वारे एंट्री केलेली निथा शेट्टी-साळवी घराबाहेर पडली. ती दोन आठवडे बिग बॉसच्या घरात होती. तिच्या एलिमेशनमुळे आता बिग बॉस मराठ्च्या घरात केवळ १० स्पर्धक उरले आहेत. मात्र आता गँगस्टर अरुण गवळी यांचा जावई आणि अभिनेता अक्षय वाघमारे हा पुन्हा बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Actress shreya bugde may be the next bigg boss wild card contestant photos viral nrp