प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री विजय लक्ष्मी उर्फ ​​मल्लिका राजपूत हिच्या आत्महत्येच्या बातमीने खळबळ उडाली आहे. तिने सोमवारी सुल्तानपूरमधील तिच्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवलं. तिच्या आत्महत्येनंतर आई सुमित्रा सिंह यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

‘एबीपी न्यूज’शी बोलताना मल्लिकाची आई सुमित्रा सिंह म्हणाल्या, “आम्ही तिथे होतो, पण आम्हाला कळलं नाही. तिने दार बंद केलं होतं आणि लाईट लावली होती. मी तिच्या खोलीजवळ तीन फेऱ्या मारल्या, पण तिने दरवाजा उघडला नाही. शेवटी मी खिडकीतून डोकावून पाहिलं तर ती उभी होती. मग मी धक्का देऊन दरवाजा उघडला तेव्हा मला दिसलं की माझी मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकत होती.”

लोकप्रिय अभिनेत्री मल्लिका राजपूतने केली आत्महत्या, घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

मल्लिकाच्या आईने पुढे सांगितले की यानंतर त्यांनी त्यांच्या पतीला फोन केला पण तोपर्यंत तिचा जीव गेला होता. आपल्या मुलीला एवढं मोठं पाऊल उचलावं लागेल, असं काहीही घडलं नव्हतं. सर्वांच्याच घरात लहान-लहान वाद होतात, तसंच आमचं बोलणं झालं होतं, असंही त्यांनी नमूद केलं.

९ दिवसांनी नदीतून सापडला प्रसिद्ध दिग्दर्शकाचा मृतदेह, हिमाचल प्रदेशमध्ये झाला होता कार अपघात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोमवारी गायिका आणि अभिनेत्री मल्लिका राजपूत तिच्या घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली. तिच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तिने बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतसह काम केलं होतं. ती कंगनाबरोबर ‘रिव्हॉल्वर रानी’ या चित्रपटात सहाय्यक भूमिकेत दिसली होती. गायक शानच्या ‘यारा तुझसे’ या म्युझिक अल्बममधून मल्लिकाला नाव आणि प्रसिद्धी मिळाली. याशिवाय मल्लिकाने अनेक मालिका व म्युझिक अल्बममध्ये काम केलं होतं.