खासगी आयुष्य असो वा एखाद्या गोष्टीबाबत खुलेपणाने बोलणं असो कलाकार मंडळी यासाठी आता सोशल मीडियाचा हमखास वापर करतात. या माध्यमातून आपल्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीबाबत कलाकार व्यक्त होताना दिसतात. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni)देखील याच कलाकारांपैकी एक आहे. आपल्या जवळच्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर तिने एक भावुक व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

आणखी वाचा – “अंगप्रदर्शन करण्याची गरज काय?” अंतर्वस्त्र परिधान न करता फोटोशूट केल्यामुळे सोनम कपूर ट्रोल

सोनालीची आजी सुशीला कुलकर्णी यांचं निधन झालं आहे. आजीच्या निधनानंतर भावुक होत सोनालीने त्यांचा एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोनालीच्याच लग्नालातला आहे. या व्हिडीओमध्ये तिची आजी अगदी आनंदाने हसताना दिसत आहे. तसेच सोनालीच्या लग्नाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.

पाहा व्हिडीओ

तसेच सोनाली तिच्या लग्नात आजीबरोबर डान्स करताना दिसत आहे. आपल्या आजीच्या निधनानंतर सोनालीला हे सुंदर आणि भावुक क्षण आठवत आहेत. सोनालीने हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “आजी तू आमच्यात असशील…आम्ही असेपर्यंत.” सोनालीने हा व्हिडीओ शेअर करताच अनेकांनी कमेंट्सच्या माध्यमातून तिच्या आजीला श्रद्धांजली वाहिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा – नितीन गडकरींनी घेतली अमिताभ बच्चन यांची भेट, व्हायरल फोटोंमधील एका गोष्टीने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

सोनालीच्या आजीचा हा व्हिडीओ पाहून तिचे चाहतेही हळहळले आहेत. दरम्यान सोनाली तिच्या लग्नामुळे सध्या चर्चेत आहे. पती कुणाल बेनोडेकरशी तिने पुन्हा थाटामाटात लग्न केलं. इतकंच नव्हे तर तिचं हे लग्न प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सीरिजच्या माध्यमातून दाखवण्यात आलं.