बॉलिवूडमधील एखादा वाद असो वा राजकीय मुद्दा अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) याबाबत खुलेपणाने बोलताना दिसते. तिची काही वादग्रस्त विधानं चर्चेचा विषय ठरत असताच. नुकताच तिचा ‘जहाँ चार यार’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. याच चित्रपटाच्यानिमित्त स्वराने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ‘बॉयकॉट’ या ट्रेंडबाबत भाष्य केलं. तसेच बॉलिवूडला या ट्रेंडचा सामना का करावा लागतो? याबाबत तिने सांगितलं.

आणखी वाचा – “जर मी तुम्हाला आवडत नसेल तर…” ट्रोलर्सला आलिया भट्टचं सडेतोड उत्तर, अभिनेत्रीचा राग अनावर

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्वराने बॉलिवूड चित्रपटांना प्रतिसाद का मिळत नाही? याची काही कारणं सांगितली. ती म्हणाली, “करोना काळानंतर लोकांनाच घराबाहेर पडायचं नाही. त्यामध्ये ओटीटीचं प्रमाण वाढलं. यामुळे चित्रपटगृहांमध्ये जाऊन चित्रपट पाहणंही कमी झालं. तसेच सुशांत सिंह राजपूतच्या दुर्देवी आत्महत्येनंतर बॉलिवूडचं एक वेगळंच चित्र निर्माण झालं. ड्रग्ज, दारू आणि सेक्स म्हणजे बॉलिवूड अशी प्रतिमा तयार झाली. माझा प्रश्न हा आहे की, जर या तीन गोष्टी सगळे जण कर असतील तर मग चित्रपट कोण तयार करतं?”

सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूडचं चित्रच बदललं असल्याचं स्वरा भास्करचं म्हणणं आहे. तसेच स्वरा म्हणाली, “देश आर्थिक मंदीचा सामना करत आहे. अशावेळी चित्रपट पाहण्यासाठी लोक पैसे खर्च करू इच्छित नाही असं अनुराग कश्यप यांचं मत आहे. त्याला मी पाठिबा देते.” स्वराने बॉलिवूड दोषी नसल्याचंही यावेळी स्पष्टपणे सांगितलं.

आणखी वाचा – Video : पारंपरिक साडी, केसात गजरा, मराठमोळा थाट अन्…; पंकजा मुंडे सूत्रसंचालकाच्या भूमिकेत, पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ती म्हणाली, “देशाच्या आर्थिक मंदीबाबत कोणीही बोलत नाही. सगळेच जण बॉलिवूडला दोष देतात. लोक चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहामध्ये येत नाहीत यासाठी बॉलिवूड जबाबदार आहे असं बोललं जात असेल तर हे पूर्ण खोटं आहे.” सध्या बॉलिवूड चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. पण स्वराच्या या आगामी चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणार का? हे पाहणं रंजक ठरेल.