तापसी पन्नू ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तापसी ही वेगवेगळ्या कारणांमुळे सतत चर्चेत असते. तापसी पन्नू लवकरच ‘रश्मी रॉकेट’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. तापसीने अनेक दाक्षिणात्य आणि बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे. सूरमा, मुल्क आणि मनमर्जिया यासारख्या अनेक सुपरहिट चित्रपटात तापसी झळकली आहे. “मी आतापर्यंत अनेक बॉलिवूड अभिनेत्यांसोबत काम केले आहे. तरीही अनेक बॉलिवूड अभिनेते आजही माझ्यासोबत काम करण्यास नकार देतात,” असे तापसी पन्नू म्हणाली. नुकतंच तापसीने दिलेल्या एका मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला.

तापसी पन्नूने दिलेल्या मुलाखतीत तिला चित्रपट आणि खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी तापसी म्हणाली, “बॉलिवूडमधील अनेक मोठे कलाकार महिलांवर आधारित चित्रपट करण्यास टाळाटाळ करतात. तसेच अनेक नवीन कलाकारांही माझ्यासोबत काम करत नाही. बॉलिवूडमधील एका अभिनेत्याने माझ्यासोबत चित्रपट काम करण्यास नकार दिला होता. यात मी दुहेरी भूमिका साकारणार होती. त्यावेळी त्याने एका तापसीला सांभाळणं अवघड आहेत, यात तर दोन आहेत, असं सांगत नकार दिला होता,” असे तिने सांगितले.

“तसेच माझ्यासोबत एका चित्रपटात स्क्रीन शेअर करण्यासाठी एका अभिनेत्याला ऑफर देण्यात आली होती. यापूर्वीही आम्ही १-२ चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्यावेळी त्याने मला हा चित्रपट करायचा नाही, असे सांगत थेट नकार दिला. या चित्रपटाच्या शेवटी सर्व सहानुभूती मुलीच्या पात्राला मिळते. ही एक प्रेमकथा होती. मी त्याला सांगितले होते की, एक अभिनेता म्हणून मला त्याच्यावर विश्वास आहे. त्याने यापूर्वीही असे अनेक चित्रपट केले आहेत. मला माझ्यासोबत काम करण्यास नकार दिला. दुर्दैवाने सिनेसृष्टीत हेच वास्तव असून ज्याला आपण दररोज सामोरे जात आहोत.” असेही ती म्हणाली.

“जेव्हा कधी मी माझ्या निर्मात्यांसोबत बसते, तेव्हा त्यांच्याकडे माझ्यासोबत काम करणाऱ्या टॉप पाच अभिनेत्यांची यादी तयार असते. हे सर्व अभिनेते यापूर्वी माझ्यासोबत स्क्रीनवर झळकलेले असतात. त्यांनाही माझ्यासोबत काम करायचे नसते. कारण आपल्या आजूबाजूच्या व्यवस्थेने आपल्याला शिकवले असते की, ज्या चित्रपटात तुमचे पात्र फक्त 10 टक्के असेल, अशा चित्रपटात काम करु नका,” असेही तिने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तापसीचा ‘रश्मी रॉकेट’ हा चित्रपट १५ ऑक्टोबरला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आकर्ष खुराना यांनी केले आहे. हा चित्रपट नंदा पेरियासामी यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. या चित्रपटात तापसी व्यतिरिक्त सुप्रिया पाठक, अभिषेक बॅनर्जी, प्रियांशु पेन्युली आणि सुप्रिया पिळगावकर हे कलाकार होते.