सध्या बॉलिवूडमधील चित्रपटांवर सर्व समाजातून चर्चा होताना दिसून येत आहे. एकीकडे बॉलिवूडचे चित्रपट फ्लॉप होत आहेत तर दुसरीकडे दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहेत. नुकताच प्रदर्शित झालेला आमिर आणि अक्षयच्या चित्रपटाला लोकांनी नाकारले. आजकाल बॉलिवूड सेलिब्रिटी लोकांच्या निशाण्यावर आले आहेत, त्यामुळे त्यांच्या चित्रपटांना फटका सहन करावा लागत आहे. यावरच अभिनेत्री तब्बूने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान तब्बू म्हणाली की, ‘मी याचा जास्त विचार करत नाही. मला वाटतं की कलाकारांनी ताण घेण्याची गरज नाही. या गोष्टींमध्ये आम्ही नशीबवान आहोत. कारण आमचे पैसे चित्रपटात गुंतवले गेले नाहीत. फक्त आपलं काम चांगलं असलं पाहिजे आणि चित्रपटही चांगला असायला हवा. निर्मात्यांना बॉक्स-ऑफिसवरील आकड्यांबद्दल काळजी असते, पण हो तुमचा चित्रपट यशस्वी होतो तेव्हा नक्कीच बरे वाटते’.

जेव्हा देशभक्तीवर प्रश्न विचारल्यावर शाहरुख खानने दिले होते सडेतोड उत्तर, म्हणाला “मी पाकिस्तान…”

तब्बूला जेव्हा विचारण्यात आले की एखाद्या अभिनेत्याची ब्रँड व्हॅल्यू आणि बॉक्स ऑफिसच्या कमाईवर त्याची किंमत जाणून घेण्याचा अर्थ काय आहे? तर या प्रश्नावर तब्बू म्हणाली, ‘जेव्हा एखादा चित्रपट यशस्वी होतो तेव्हा प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने फायदा होतो. मात्र जर चित्रपटाला अपयश आले तर याचा त्रास नक्कीच होतो. तब्बू पुढे म्हणाली की, एखादा चित्रपट यशस्वी असो की अयशस्वी, एखाद्या अभिनेत्याच्या करिअरचे भवितव्य लगेच ठरत नाही, त्यासाठी वेळ लागतो. एखादा चित्रपट फ्लॉप झाला की अभिनेत्याचे करिअर लवकर संपते, असे मला वाटत नाही. चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे काम मिळणे बंद होते, असेही नाही.

View this post on Instagram

A post shared by Tabu (@tabutiful)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तब्बू नुकतीच ‘भूल भुलैया २’ मध्ये दिसली होती, ज्यामध्ये तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते, तर चित्रपटाने चांगली कमाई देखील केली होती. तब्बू लवकरच अजय देवगण बरोबर दृश्यम २ मध्ये दिसणार आहे.