Zeenat Aman Shares Emotional Note After Flying Air India : बॉलीवूड अभिनेत्री झीनत अमान सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. झीनत स्वतःशी संबंधित अपडेट्स चाहत्यांसह शेअर करत राहतात.
झीनत अमान यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एअर इंडियाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. अहमदाबाद विमान अपघातानंतर झीनत यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. जाणून घेऊया झीनत यांनी या पोस्टमध्ये काय म्हटले आहे?
झीनत अमान यांनी पोस्ट शेअर केली
झीनत अमान यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये झीनत यांनी स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. याबरोबरच त्यांनी एक कॅप्शनदेखील लिहिले आहे. झीनत यांनी लिहिले की, आज सकाळी एअर इंडियाच्या विमानात बसले आणि सीट बेल्ट लावताच मी भावनेने भारावून गेले. ज्यांनी आपल्या प्रियजणांना गमावले त्यांच्याबरोबर आपले सांत्वन असेल.
१२ जून रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान कोसळले. या घटनेने संपूर्ण देश हादरला. या घटनेवर सर्वांनी शोक व्यक्त केला. सामान्य माणसापासून ते व्हीआयपींपर्यंत सर्वांनी या दुःखद घटनेसाठी आणि पीडितांच्या कुटुंबांसाठी प्रार्थना केली.
चित्रपट कलाकारांनीही दुःख व्यक्त केले
अहमदाबाद विमान अपघातानंतर, या अपघाताचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले. या छायाचित्रांमध्ये, अपघात किती भयानक होता हे दिसून येते. पीडित कुटुंबीयांना झालेल्या वेदना कमी करता येणार नाहीत. या कठीण काळात संपूर्ण देश पीडितांच्या पाठीशी उभा आहे. चित्रपट कलाकारांनीही एअर इंडियाच्या या विमान अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले.

अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा, अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान, विक्रांत मॅसी, आलिया भट्ट यांच्यासह सर्व स्टार्सनी एअर इंडिया विमान अपघाताबद्दल शोक व्यक्त करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या. सर्व स्टार्सनी या घटनेला दुःखद म्हटले आणि पीडित कुटुंबासाठी प्रार्थनाही केली.
९० च्या दशकातील दिग्गज अभिनेत्रींपैकी एक म्हणून झीनत अमान यांची ओळख आहे. झीनत अमान यांनी एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. झीनत अमान यांचा आजही मोठा चाहतावर्ग आहे. तसेच त्या सोशल मीडियाच्या माध्यमातूनदेखील प्रेक्षकांच्या संपर्कात असतात. त्या सोशल मीडियावरील अनेक कलाकारांचे, त्यांच्या चित्रपटांचे, तसेच शूटिंगदरम्यान घडलेल्या घटनांचे किस्से सांगतात.