बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर १९ फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकले. शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर हे लग्नानंतर सातत्यानं चर्चेत आहेत. लग्नानंतर त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फरहान आणि शिबानीला अनेक चाहते नवविवाहित दाम्पत्याला शुभेच्छा देताना दिसत आहे. तर दुसरीकडे फरहानची पहिली पत्नी अधुना भाबानीला नेटकरी ट्रोल करताना दिसत आहे. यामुळे अधुनाने संतप्त होत एक पोस्ट शेअर केली आहे.

शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर यांच्या लग्नानंतर अधुनाला प्रचंड ट्रोल केले जात आहे. सतत होणाऱ्या ट्रोलिंगमुळे अधुनाचा संयम तुटला आहे. तिने ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. अधुनाने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यावर तिने नेटकऱ्यांना अप्रत्यक्षरित्या सल्ला दिला आहे.

यावर अधुना म्हणाली, “ज्या युजरकडे सकारात्मक बोलण्यासारखे काहीही नाही. मी त्याला थेट ब्लॉक करणार आहे”. अधुनाच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. प्रिती झिंटा, मनीषा कोईराला यांसह अनेक अभिनेत्रींनी हार्ट इमोजी शेअर करत तिला पाठिंबा दिला आहे.

अधुना भाबानी आणि फरहान अख्तर यांनी २००० मध्ये लग्न केले होते. फरहान अख्तरनं २०१६ साली पत्नी अधुनापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता आणि २०१७ साली दोघांचा कायदेशीर घटस्फोटही झाला. जवळपास १६ वर्षांचा संसार मोडत हे दोघं वेगळे झाले.

“मी नाही म्हणायला हवे होते पण…”, माधुरी दीक्षितने केले विनोद खन्नांसोबतच्या किसिंग सीनवर भाष्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फरहानची पहिली पत्नी अधुना ही पेशानं सेलिब्रेटी हेअरस्टायलिस्ट आहे. लंडनमध्ये जन्मलेली अधुना ही फरहान अख्तरपेक्षा वयानं ६ वर्षांनी मोठी आहे. ती ‘बी ब्लंट’ नावाची सलून फ्रांचाइजी चालवते. एकमेकांना ३ वर्षं डेट केल्यानंतर फरहान आणि अधुना यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. या दोघांना शाक्या आणि अकीरा नावाच्या दोन मुली देखील आहेत.