शिवसेनेचे युवा नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व अभिनेत्री दिशा पटानी या दोघांचा १३ जून रोजी वाढदिवस असतो. या वाढदिवसानिमित्त दिशाने ट्विट करत आदित्य ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा आदित्य ठाकरे. असाच चमकत राहा आणि शानदार प्रगती कर’, असं तिने ट्विट केलं. त्यानंतर आदित्य ठाकरेंनीही दिशाला शुभेच्छा दिल्या आहेत.

‘धन्यवाद दिशा. तू त्या ठराविक लोकांपैकी आहेस ज्यांना मी १३ जून रोजी वाढदिवसानिमित्त ‘तुलासुद्धा शुभेच्छा’ असं म्हणू शकतो. अशीच चमकत राहा आणि प्रगती कर’, म्हणत आदित्य ठाकरेंनी तिला शुभेच्छा दिल्या. आदित्य ठाकरे यांचं नाव अनेकदा दिशासोबत जोडलं गेलं आहे. हे दोघंही एकमेकांचे चांगले मित्र असून अनेकदा त्यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मुलाखतींमध्येही अनेकदा या दोघांना एकमेकांविषयी प्रश्न विचारले गेले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तरुणांचे नेते म्हणून ओळखले जाणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्याबद्दल तरुणाईलाही अनेक प्रश्न आहेत. असाच एक प्रश्न म्हणजे आदित्य ठाकरे कधी आणि कोणासोबत लग्न करणार? एका कार्यक्रमात अवधूत गुप्ते यांनी अप्रत्यक्षपणे अभिनेत्री दिशा पटानीचा उल्लेख करत आदित्य ठाकरे यांना यासंबंधी प्रश्न विचारला होता. यावेळी आदित्य ठाकरे यांनीही तुमची दिशा चुकली आहे असं मिश्कील उत्तरही दिलं होतं.