बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. हे दोघे नुकतेच नव्या वर्षाच्या स्वागतानिमित्त लेकीबरोबर दुबई येथे गेले होते. आपली सुट्टी संपवून ते पुन्हा भारतात परतले आहेत. नवीन वर्षाचे स्वागत केल्यानंतर दोघे धार्मिक झाले आहेत, कारणहे दोघे नुकतेच वृंदावन येथील वृंदावनमध्ये दोघेही नीम करोली बाबाच्या समाधी आश्रमात पोहोचले. विराट- अनुष्काच्या मॅनेजरने सांगितले की, दोघेही धार्मिक सहलीवर आहेत.
२०२२ वर्ष संपून २०२३ सुरु झाले अंकांनी नव्या वर्षाचे संकल्प केले आहेत. या जोडप्यानेदेखील आता धार्मिक झालेले दिसत आहेत. माध्यमांच्या माहितीनुसार दोघांनी जवळपास एक तास आश्रमात राहून ध्यान केले. विराट आणि अनुष्का हे नीम करोली बाबाचे महान भक्त आहेत. गेल्या वर्षीही दोघेही उत्तराखंडमधील कैंची धाम येथील त्यांच्या आश्रमात पोहोचले होते.
लोकांनी ‘पठाण’ चित्रपट का पाहावा? चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुख खान म्हणाला…
४ जानेवारीला सकाळी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी वृंदावनातील प्रसिद्ध नीम करोली बाबाच्या समाधी स्थळाला भेट दिली. यानंतर दोघे माता आनंदमयी आश्रमाकडे रवाना झाले. त्यांचा कार्यक्रम पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आला होता. विराट-अनुष्का बुधवारी दुपारी वृदनवनला पोहोचणार होत्या पण ते त्यांच्या नियोजित वेळापत्रकाच्या आधी सकाळीच नीम करोली बाबाच्या समाधी आश्रमात पोहोचले. दोघांनी आश्रमात ध्यान केले आणि आशीर्वाद घेतले, तसेच दोघांनी ब्लॅंकेट वाटल्याचेदेखील सांगण्यात आले आहे.
अनुष्का शर्माने २०१७ मध्ये क्रिकेटपटू विराट कोहलीबरोबर लग्नगाठ बांधली. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या जोडीकडे एक आदर्श जोडी म्हणून बघितले जाते. ते दोघेही त्यांच्या व्यस्त करिअरमध्येही एकमेकांसाठी वेळ काढत असतात. विराट आणि अनुष्काच्या लग्नाला ५ वर्षे पूर्ण झाली आहे.