बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला NCB ने क्रुझ ड्रग्स केसमध्ये क्लीन चीट दिली आहे. २७ मे ला न्यायालयानं दिलेला निकाल हा खान कुटुंबीयांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी ठरली. मात्र आर्यन खानचा मित्र अरबाज मर्चेंटच्या विरोधात मात्र खटला दाखल करण्यात आला आहे. जामिनावर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आर्यन खान त्याच्या आगामी प्रोजेक्टवर काम करत आहे. पण आता NCB कडून क्लीन चीट मिळाल्यानंतर आर्यन खान लवकरच अमेरिकेला जाणार असल्याचं बोललं जातंय.

काही रिपोर्टकडून मिळालेल्या माहितीनुसार आर्यन खान मागच्या काही काळापासून एका वेब सीरिजच्या प्रोजेक्टवर काम करत आहे. आता क्लीन चीट मिळाल्यानंतर आर्यनला त्याचा पासपोर्ट NCB कडून परत मिळणार आहे. जेव्हा त्याला या प्रकरणात अटक करण्यात आली त्यावेळी त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात आला होता. मात्र आता पासपोर्ट परत मिळाल्यानंतर तो पुन्हा प्रवास करू शकणार आहे. त्यामुळे त्याचा पहिला प्लान हा अमेरिकेला जाण्याचा असल्याचं बोललं जात आहे. मात्र शाहरुख खान किंवा आर्यनकडून यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

आणखी वाचा- “एका राजकीय पक्षाच्या कार्यक्रमामुळे…” अभिनेता उमेश कामतची ‘ती’ पोस्ट चर्चेत

काही मीडिया रिपोर्टनुसार आर्यन खानच्या या वेब सीरिजला काही लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मकडून मान्यता मिळाली आहे. एवढंच नाही तर तो या प्रोजेक्टसाठी इंडस्ट्रीतील फिल्ममेकर्स आणि लेखकांसोबत काम करत आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वीच आर्यन खाननं एका शोसाठी टेस्ट शूट देखील केलं होतं. ज्यात अनेक टॅलेंटेड कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र याबाबत नंतर कोणतीही माहिती समोर आली नाही.

आणखी वाचा- Video: रणजीत ढालेपाटील पुन्हा दिसणार वर्दीत! ‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेत नवं वळण

दरम्यान या हायप्रोफाइल केसमध्ये NCB ने ६ महिन्यांनंतर ६ हजार पानांची एक चार्जशीट न्यायालयात सादर केली होती. ज्यात १४ आरोपींच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. तसेच एकूण २० आरोपींपैकी ६ आरोपींच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे न मिळाल्याने क्लीन चीट देण्यात आली. दरम्यान ३० ऑक्टोबरला जामिनावर तुरुंगातून बाहेर पडलेल्या आर्यन खानवर NCB ने ड्रग्स तस्करीमध्ये सहभागी होण्याचा तसेच ड्रग्सचं सेवन केल्याचा आरोप लावला होता.