बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे ही गेले काही दिवस चांगलीच चर्चेत आहे. ती आणि दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा यांचा ‘लाइगर’ हा चित्रपट चांगलाच आपटला असल्याने सध्या या दोघांना प्रचंड ट्रोल केलं जात आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानही विजय देवरकोंडा याने काही वादग्रस्त वक्तव्यं केली होती. त्यामुळेच ‘लाइगर’वर ही नामुष्कीची वेळ आली असल्याचं म्हंटलं जात आहे.

अनन्या लवकरच आयुष्मान खुरानाबरोबर ‘ड्रीम गर्ल २’ या चित्रपटात दिसणार आहे. ‘ड्रीम गर्ल’चा पहिला भाग लोकांच्या चांगलाच पसंतीस पडला होता. त्यामुळेच या चित्रपटाचा पुढचा भाग काढण्याचं याच्या निर्मात्यांनी ठरवलं आहे. याच चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अनन्या सध्या अभिनेता आयुष्मानबरोबर मथुरा येथे आली आहे.

नुकतंच तिने मथुरामध्ये काढलेले काही फोटोज तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती मथुरा फिरायला आली आहे असं जरी दिसत असलं तरी ते त्यामागचं मुख्य कारण नव्हे. ‘राधे-राधे’ असं कॅप्शन देत अनन्याने मथुरामधल्या पर्यटनासाठी लोकप्रिय असलेल्या ठिकाणांवर काढलेले फोटोज शेअर केले आहेत. हे फोटो पाहून सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं जात आहे. ‘लाइगर’ फ्लॉप झाला म्हणून यांना आता भक्तिभाव आठवतोय, असं म्हणत काहींनी तिच्यावर जबरदस्त टीकादेखील केली.

आणखी वाचा : आमिरचा नव्हे तर धनुषचा ‘हा’ चित्रपट परदेशात रचतोय इतिहास, कमाईचे आकडे पाहून व्हाल थक्क

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकता कपूर निर्मित ‘ड्रीम गर्ल २’ या चित्रपटात अनन्या आणि आयुष्मानबरोबर परेश रावल आणि सीमा पाहवासारखे कलाकारही झळकणार आहेत. याबरोबरच अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरवबरोबर अनन्या ‘खो गये हम कहां’ या चित्रपटातही दिसणार आहे. ‘ड्रीम गर्ल’च्या पहिल्या भागात आयुष्मानची भूमिका लोकाना प्रचंड आवडली होती. इतकंच नव्हे तर २०१९ मध्ये या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई देखील केली. प्रेक्षक आता याच्या दुसऱ्या भागासाठी अत्यंत उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे.